Manoj Jarange | ‘या’ दोन समाजांच्या आरक्षणासाठी जरांगे लढणार, म्हणाले ‘आरक्षण कसं देत नाही तेच बघतो’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यासाठी कुणबी नोंदणी असणाऱ्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे जरांगेंच्या (Manoj Jarange) लढ्याला यश आल्याचं बोललं जात आहे. तसेच मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे. मराठा समाजानंतर जरांगेंनी आणखी दोन समाजांच्या आरक्षणासाठी लढणार असल्याचं म्हटलंय.

‘या’ दोन समाजांच्या आरक्षणासाठी जरांगे लढणार

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आणखी दोन समाजांसाठी आरक्षणाचा लढा लढण्याचा संकल्प मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) बोलून दाखवला. मराठ्यांच्या आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे. ते झाल्यानंतर धनगर आणि मुस्लिमांना सरकार आरक्षण कस देत नाही तेच बघतो?, असं जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसीसाठी काही करता आले नाही, तर मंत्रिमंडळातून राजीनामा देणार, असं छगन भुजबळ म्हणतायत. आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. आता देऊन काय उपयोग?. कर म्हणा तुला काय करायच ते, सरकार कुठे भीतय त्याला, असंही जरांगेंनी म्हटलंय.

Manoj Jarange | “रायगडावर आल्यानंतर विजय प्राप्त होतो”

मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील आज रागयडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन घेणार आहेत. रायगडावर आल्यानंतर विजय प्राप्त होतो, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

कधी नव्हे, तो 70 वर्षात आता मराठ्यांसाठी कायदा बनलाय. मराठ्यांना आरक्षण मिळेलच, पण त्या सोबत सग्यासोयऱ्यानाही आरक्षणाचा लाभ मिळेल. एकही मराठा ओबीसीत जाण्यापासून वंचित राहणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणाच्या बाजूचे नाहीत. ते सत्याच्या बाजूने उभे राहणार. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे सहाजिकच त्यांना साथ द्यावी लागेल. माझ कोणाबरोबरही राजकीय वैर नाही, असंही मनोज जरांगेंनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

SSC Exam Hall Ticket | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

Filmfare Awards 2024 | अवॉर्ड जिंकल्याचा आनंद गगनात मावेना; आलिया-रणबीरचा डान्स अन् KISS

Hemant Soren | ED ची मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरावर छापा, BMW जप्त

IND vs ENG | क्रिकेटसाठी सरकारी नोकरीला मारली लाथ; जड्डूची जागा घेणारा सौरभ कोण आहे?

IND vs ENG | पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; 3 नव्या चेहऱ्यांना संधी, जड्डू-राहुल बाहेर