Gold-Silver Price Today | सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Price Today | 2024 च्या वर्षातील पहिल्या महिन्यात जानेवारीमध्ये सोने-चांदीचे भाव (Gold-Silver Price Today) कमी झाले होते. जानेवारीमध्ये सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाले होते. डिसेंबर महिन्यात या किमती अधिक होत्या. त्यामुळे या महिन्यात ग्राहकांना थोडा दिलासाच मिळाला असल्याचं दिसतंय. या महिन्याच्या शेवटी सोने-चांदीचे भाव काही अंशांनी वधारले आहेत.

त्यातच बजेटही जवळच असल्याने या भावात अजून उसळी येण्याची शक्यता आहे. मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात 10 प्रति ग्रामने 300 रुपयांची वाढ झाली होती. तर, चांदीतही 200 रुपये वाढले होते. सध्या सोने-चांदीच्या किंमती खाली दिल्या आहेत.

सोने-चांदीचे आजचे दर

जानेवारीच्या सुरुवातीला (Gold-Silver Price Today) सोने 2200 रुपयांनी उतरले होते. आता या आठवड्यात सोन्याचा भाव शंभर रुपयांनी वाढला आहे. यानुसार 22 कॅरेट सोने 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर, चांदीत काल 200 रुपयांची वाढ झाली. सुरुवातीच्या काही दिवसांत चांदीत 4400 रुपयांची घसरण दिसली. सध्या एक किलो चांदीसाठी तुम्हाला 76,200 रुपये मोजावे लागणार आहेत.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने आजचे दर (Gold-Silver Price Today) जाहीर केले आहेत. त्यानुसार, 24 कॅरेट सोने 62,515 रुपये, 23 कॅरेट 62,265 रुपये, 22 कॅरेट सोने 57,264 रुपये झाले आहे. तर, 18 कॅरेट सोने 46,886 रुपये, 14 कॅरेट सोने 36,571 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

तसेच एक किलो चांदीचा भाव 71,371 रुपये झाला आहे. यासोबतच वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लागून केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत होत असते.

News Title- Gold-Silver Price Today

 महत्त्वाच्या बातम्या –

Filmfare Awards 2024 | अवॉर्ड जिंकल्याचा आनंद गगनात मावेना; आलिया-रणबीरचा डान्स अन् KISS

Hemant Soren | ED ची मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरावर छापा, BMW जप्त

IND vs ENG | क्रिकेटसाठी सरकारी नोकरीला मारली लाथ; जड्डूची जागा घेणारा सौरभ कोण आहे?

IND vs ENG | पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; 3 नव्या चेहऱ्यांना संधी, जड्डू-राहुल बाहेर

“मी JEE नाही करू शकत, आई-बाबा मला माफ करा”, 18 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन