Hemant Soren | ED ची मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरावर छापा, BMW जप्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hemant Soren | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) हेमंत सोरेन यांच्यावर सोमवारी संध्याकाळी मोठी कारवाई केली. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी तपास पथकाने काही कागदपत्रे आणि त्यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे तपास पथक सोमवारी झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले.

तपास पथकाच्या टीमने 12 तासांहून अधिक काळ दिल्लीतील सोरेन यांच्या निवासस्थानी तळ ठोकला. सोरेन यांनी ईडीवर राज्य सरकारच्या कामकाजात अडथळा आणण्यासाठी ‘राजकीयदृष्ट्या प्रेरित’ असल्याचा आरोप केला.

ED ची मोठी कारवाई!

फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला पाठवलेल्या ईमेलमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकारी अध्यक्षांनी आरोप केला आहे की, त्यांना समन्स जारी करणे हे पूर्णपणे खेदजनक आणि कायद्याने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणांवर टीका केली. सरकारला अस्थिर करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Hemant Soren यांच्या अडचणीत वाढ

रविवारी पाठवलेल्या ईमेलमध्ये सोरेन यांनी सांगितले होते की, 20 जानेवारीला झालेल्या माझ्या चौकशीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग गोळा करून कोर्टात उपलब्ध करून द्यावे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सोरेन 27 जानेवारीच्या रात्री रांची येथून दिल्लीसाठी रवाना झाले. JMM नेते सोरेन यांनी एजन्सीला एक ईमेल पाठवला आहे, ज्यामध्ये त्यांनी 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्या रांची निवासस्थानी ईडीच्या तपासकर्त्यांकडून चौकशीच्या नव्या फेरीसाठी सहमती दर्शविली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या झारखंड युनिटने मात्र याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. झारखंडचे मुख्यमंत्री ईडीच्या भीतीने पळ काढत आहेत, तपास यंत्रणा त्यांचे काम करत असून ईडी कारवाई करेल या भीतीने ते मागील तासांपासून ‘फरार’ आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.

झारखंडचे भाजप अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले. तसेच या प्रकरणामुळे झारखंडची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे त्यांनी नमूद केले.

News Title- ED has taken a major action against Jharkhand Chief Minister Hemant Soren and his BMW car has been seized

महत्त्वाच्या बातम्या –

IND vs ENG | क्रिकेटसाठी सरकारी नोकरीला मारली लाथ; जड्डूची जागा घेणारा सौरभ कोण आहे?

IND vs ENG | पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; 3 नव्या चेहऱ्यांना संधी, जड्डू-राहुल बाहेर

“मी JEE नाही करू शकत, आई-बाबा मला माफ करा”, 18 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन

Punjab | दारूचा घोट घेऊन स्टेअरिंग हाती घ्याल तर पोलिसांसोबत घरी जाल; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

PM मोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, Bollywood कलाकारांनाही पडली भुरळ