SSC Exam Hall Ticket | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

SSC Exam Hall Ticket | दहावी बारावीच्या परीक्षा आता फार लांब नाहीत. विद्यार्थी परीक्षेसाठी आता पासूनच तयारीत आहेत. आता परीक्षेचे हॉल तिकीट (SSC Exam Hall Ticket ) केव्हा येणार, याची त्यांना प्रतिक्षा लागली आहे. यासंबंधीच राज्य शिक्षण मंडळाने एक महत्वाची माहिती दिली आहे.

त्यानुसार उद्यापासून म्हणजेच 31 जानेवारीपासून विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र विद्यार्थी ऑनलाइन प्राप्त करू शकतात.

‘या’ तारखेला मिळणार हॉल तिकीट

यासोबतच बोर्डाने (SSC Exam Hall Ticket ) यंदाच्या परीक्षेचे काही नियम बदलले आहेत. त्यानुसार परीक्षाचा वेळ दहा मिनिटांनी वाढवून देण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थी आणि पालकांनीच मागणी केली होती. म्हणून विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी अर्धातास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे.

म्हणजेच सकाळी 11 वाजता जर परीक्षा सुरु होणार असेल तर विद्यार्थ्यांना 10: 30 वाजताच परीक्षा केंद्रावर जावे लागेल. तसेच पेपर दुपारी 3 वाजता असेल तर अडीच वाजता केंद्रावर जावे लागेल.

परीक्षा कधीपासून असणार?

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक (SSC Exam Hall Ticket) श्रेणी आणि तोंडी परीक्षा येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर लेखी परीक्षेला 26 मार्चपासून सुरुवात होईल. यासाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून हॉल तिकीट दिले जाणार आहे. हॉल तिकीटासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क घेण्यात येणार नाहीत.

यासोबतच बोर्डाने अजून एक नियम बदलला आहे. त्यानुसार आता सीबीएसई बोर्ड आता विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी देणार नाही. तसेच श्रेणीसुद्धा मिळणार नाही. महाविद्यालयात प्रवेश घेताना संबंधित शैक्षणिक संस्था गुण किंवा श्रेणी देणार आहे.

News Title-  SSC Exam Hall Ticket 2024 

महत्त्वाच्या बातम्या –

Filmfare Awards 2024 | अवॉर्ड जिंकल्याचा आनंद गगनात मावेना; आलिया-रणबीरचा डान्स अन् KISS

Hemant Soren | ED ची मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरावर छापा, BMW जप्त

IND vs ENG | क्रिकेटसाठी सरकारी नोकरीला मारली लाथ; जड्डूची जागा घेणारा सौरभ कोण आहे?

IND vs ENG | पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; 3 नव्या चेहऱ्यांना संधी, जड्डू-राहुल बाहेर

“मी JEE नाही करू शकत, आई-बाबा मला माफ करा”, 18 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन