Hrithik Roshan | अभिनेता हृतिक रोशनने केली सर्वांत मोठी घोषणा!

Hrithik Roshan | अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण यांचा ‘फाईटर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवत आहे. धमाकेदार अॅक्शन सीनमुळे चाहत्यांना चित्रपट आवडत आहे. हृतिकने यात एयर पायलटची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. आपल्या बॉडी लॅंगवेज आणि फिजिकल ट्रांसफॉर्मेशनसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.

आता हृतिक ने आपल्या आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्याने ‘क्रिश 4’ बाबत मोठी माहिती दिली आहे. त्यामुळे लवकरच हृतिक ‘क्रिश 4’ (krish 4) मध्ये दिसून येईल. चाहत्यांना आता ‘जादू’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसून येईल.

Hrithik Roshan चं मोठं वक्तव्य

“‘क्रिश 4’ हा चित्रपट पूर्वीपेक्षा डिफिकल्ट असणार आहे. याबाबत आताच बोलणे खूप घाईचे ठरेल. त्याचे काम सुरू आहे. हा खूप डिफिकल्ट चित्रपट असेल आणि तुम्हाला त्याची बिजनेस साइड बघायला मिळेल. यासोबतच चित्रपटाच्या स्क्रिप्टवर किती काम झाले आहे, हेही पाहायला मिळणार आहे. यासाठी मी आनंदी आहे, पण अजून बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.”, असे हृतिक रोशन ((Hrithik Roshan) ) म्हणाला आहे.

त्यामुळे सध्या तरी ‘क्रिश 4’ चित्रपटसाठी चाहत्यांना वाट बघावी लागणार आहे. दरम्यान, हृतिकच्या ‘फाईटर’ची बॉक्स ऑफिसवर धूम आहे. काही दिवसांतच चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. फाइटिंग सीन व्यतिरिक्त हृतिक आणि दीपिकाची जोडीही पसंत केली जात आहे. चित्रपटातील गाणीदेखील बरीच हीट झाली आहेत.

‘क्रिश’ चित्रपटाचा चौथा पार्ट येणार

‘क्रिश’ या चित्रपटाचे आतापर्यंत 3 पार्ट आले आहेत. याचा सर्वांत पहिला चित्रपट हा ‘कोई मिल गया’ हा होता. यामध्ये हृतिक ((Hrithik Roshan) ) सोबत मुख्य भुमिकेत अभिनेत्री प्रीती झिंटा होती. याच चित्रपटातून ‘जादू’ समोर आला होता. पुढे याचे दोन पार्ट काढण्यात आले.

‘क्रिश 2’ मध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा हृतिकसोबत मुख्य भूमिकेत होती. यासोबतच अभिनेत्री रेखादेखील यात मुख्य भूमिकेत होत्या. यामध्ये विवेक ओबेरॉयने विलनची भूमिका साकारली होती. आता ‘क्रिश 4’ मध्ये कोणत्या अभिनेत्रीला घेतलं जाणार, याकडे सर्वांची नजर असेल.

News Title- Hrithik Roshan share update on krrish 4

 महत्त्वाच्या बातम्या –

Filmfare Awards 2024 | अवॉर्ड जिंकल्याचा आनंद गगनात मावेना; आलिया-रणबीरचा डान्स अन् KISS

Hemant Soren | ED ची मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरावर छापा, BMW जप्त

IND vs ENG | क्रिकेटसाठी सरकारी नोकरीला मारली लाथ; जड्डूची जागा घेणारा सौरभ कोण आहे?

IND vs ENG | पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; 3 नव्या चेहऱ्यांना संधी, जड्डू-राहुल बाहेर

“मी JEE नाही करू शकत, आई-बाबा मला माफ करा”, 18 वर्षीय विद्यार्थिनीनं संपवलं जीवन