वर्ल्ड क्रिकेटचा कारभार Jay Shah यांच्याकडे? BCCI सचिव बड्या पदाच्या शर्यतीत!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jay Shah | जागतिक क्रिकेटचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC). आयसीसीच्या सर्वोच्च पदावर अर्थात अध्यक्षपदी पुन्हा एकदा भारतीय चेहरा विराजमान होऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह या वर्षाच्या अखेरीस आयसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारू शकतात. येत्या काही दिवसांतच याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते. जय शाह हे सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत.

जय शाह 2019 मध्ये बीसीसीआयचे सचिव बनले आणि तेव्हापासून ते या भूमिकेत कार्यरत आहेत. याशिवाय आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली, जिथे ते सलग दुसरा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. ही जबाबदारी ते पुन्हा पार पाडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

BCCI सचिव बड्या पदाच्या शर्यतीत!

Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, आशियाई क्रिकेट परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे दोन दिवस इंडोनेशियामध्ये होणार आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. एसीसीच्या नवीन अध्यक्षाबाबतची चर्चा हा या बैठकीचा अधिकृत अजेंडा नसला तरी त्यावर चर्चा होऊ शकते.

या वर्षाच्या अखेरीस आयसीसीची निवडणूक लागणार आहे, जी अध्यक्षपदासाठी असेल. असे सांगण्यात आले आहे की, या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयसीसी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह या निवडणुकीत उतरू शकतात. आता या भूमिकेसाठी जय शाह यांनी आपला अर्ज केला तर त्याची निवड जवळपास निश्चित होईल कारण जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा दबदबा असल्याने त्यांच्या विरोधात कोणी उभे राहील याची शक्यता फार कमी आहे.

Jay Shah ICC ची निवडणूक लढणार?

बीसीसीआयमधून आलेले आयसीसीचे पूर्वीचे अध्यक्ष शशांक मनोहर होते. शशांक मनोहर 2015 ते 2020 पर्यंत आयसीसीच्या अध्यक्षपदी होते, त्यानंतर न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांनी हे पद स्वीकारले. त्यामुळे आगामी काळात वर्ल्ड क्रिकेटचा कारभार पुन्हा एकदा भारतीयाकडे येतो का हे पाहण्याजोगे असेल.

जय शाह सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष 2 वर्षांसाठी निवडला जातो आणि प्रत्येक सदस्य मंडळाच्या अधिकाऱ्याला ही भूमिका बदलून मिळते. जय शाह 2019 मध्ये बीसीसीआयचे सचिव झाले आणि तेव्हापासून ते ही जबाबदारी पार पाडत आहेत.

News Title- BCCI secretary and ACC president Jay Shah is likely to apply for the post of ICC president
महत्त्वाच्या बातम्या –

Sukesh Chandrashekhar च्या फसवणुकीत जॅकलीनचाही ‘हात’, अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ; ED चा मोठा दावा

Vicky Jain | विकी जैनचा सुशांतबद्दल मोठा खुलासा; म्हणाला,”अंकिता आणि सुशांतमुळे..”

Manoj Jarange | सरकारचं टेंशन वाढलं, जरांगेंना संशय, पुन्हा केली मोठी घोषणा

Ashok Saraf | मोठी बातमी! अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर

Health Insurance असेल तर ही बातमी नक्की वाचा, आता होईल फायदाच फायदा