Vicky Jain | विकी जैनचा सुशांतबद्दल मोठा खुलासा; म्हणाला,”अंकिता आणि सुशांतमुळे..”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vicky Jain | ‘बिग बॉस 17’ हा लोकप्रिय शो आता संपला आहे. 28 जानेवारी रोजी त्याचा अंतिम एपिसोड झाला. या फिनालेमध्ये मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यात लढत होती. मात्र सर्वांना मागे टाकत डोंगरीचा मुनव्वर फारुकी याने बाजी मारली. आता बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अंकिता लोखंडेचा पती विकी जैनने (Vicky Jain) अंकिता आणि सुशांतबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला विकी जैन?

विकी जैन (Vicky Jain) याने एका मुलाखती दरम्यान बिग बॉस मधील जर्नी आणि जेव्हा तो बिग बॉस मध्ये होता तेव्हा लोक त्याच्याबद्दल मागे काय बोलत होते या सर्व गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आहे.तो म्हणाला की, “रिलेशनशिपमध्ये कधी कधी अनेक गोष्टी होत असतात ज्यासाठी आपण तयार नसतो. अशा परिस्थितीमध्ये आपण एकमेकांना सपोर्ट करायला हवे आणि आपले रिलेशनशिप कसे स्ट्राँग होईल याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.”, असे विकी म्हणाला.

पुढे तो म्हणाला की, ‘मला माहितीये अंकितासाठी सुशांत काय होता. मला त्यांच्या नात्याबद्दल सर्व काही माहिती होते. त्यांच्या नात्याबद्दल मी कायमच पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे मला या गोष्टींचा फरक पडत नाही, मी खूप प्रॅक्टिकल आहे.’ नात्यात प्रॅक्टिकल असणे गरजेचे असते. या सर्व गोष्टी होतच असतात. पण, तुम्ही नेहमी प्रॅक्टिकल राहायला हवे. अंकिताच्या मनात सुशांतबद्दल काय भावना आहेत याबद्दल मला सर्व काही माहिती आहे. त्यामुळे सुशांतमुळे मी कधीही इनसिक्युअर नाही झालो, असे विकी म्हणाला आहे.

अंकिता आणि विकी यांच्यात सुशांतमुळे वाद

यंदाचा बिग बॉसचा सीजन अंकिता लोखंडे आणि विकी जैन (Vicky Jain) तसेच मूनव्वर फारुकी यांच्यामुळे चांगलाच गाजला. अंकिता आणि विकी लग्नानंतर या शोमध्ये सहभागी झाले मात्र त्यांच्यातील प्रेम नव्हे तर वादच अधिक दिसून आले. अगदी पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात त्यांच्यामध्ये अनेक वाद झाले. त्यांची भांडण कधी कधी इतक्या टोकाची गेली की त्यांनी एकमेकांबद्दल लग्न करून चूक केल्याचेही म्हटले. त्यातच अंकिता लोखंडे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग याचा सतत उल्लेख बिग बॉसच्या घरात करत असे.

कधी काळी अंकिता आणि सुशांत हे रिलेशनशिप मध्ये होते. मात्र, सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अंकिताने विकी जैनसोबत संसार थाटला. अंकिताचे सततचे सुशांत बद्दल बोलणे हे विकी आणि त्याच्या कुटुंबीयांना खटकत असे. याबद्दल अंकिताच्या आईने बिग बॉसच्या घरी येऊन तिला सल्लाही दिला होता. ‘तू आता सुशांत बद्दल बोलणे बंद कर, तुझ्या सासरच्यांना याचा त्रास त्रास होतोय.’, असा सल्ला अंकिताच्या आईने तिला दिला होता. आता सुशांत आणि अंकिता यांच्या नात्याबद्दल तिचा पती विकी जैन याने मोठी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, बिग बॉसमधू बाहेर पडल्यानंतर विकीने हा मोठा खुलासा केला आहे. बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात अजून वाद होतील, असे म्हटले जात होते. मात्र, आमच्यात सगळं काही ठीक आणि नॉर्मल असून आम्ही आनंदी आयुष्य जगत असल्याचे विकी म्हणाला आहे.

News Title-  Vicky Jain revelation about Ankita and Sushant relationship

 महत्त्वाच्या बातम्या –

“मापात रहा, कसला माज दाखवतो तू?, एका दणक्यात तुझं…”; पुष्कर जोगला ‘या’ अभिनेत्याने झापलं

Fruit seeds Disadvantages | ‘या’ फळांच्या बिया खाल्ल्याने ओढवू शकतो मृत्यू; आताच सतर्क व्हा

Petrol Diesel Price Today | राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव काय?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

‘आजपर्यंत मी ज्या बायकांसोबत….’; Munawar Faruqui चं मोठं वक्तव्य

Sara Ali Khan पुन्हा पडली प्रेमात?, सर्वांसमोर केलं असं काही की….