Sukesh Chandrashekhar | मागील काही वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस वादाच्या भोवऱ्यात आहे. तिच्यावर ठग सुकेशच्या मनी लाँड्रिंग प्रकरणावरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अशातच आता अंमलबजावणी संचालनालयाने एक धक्कादायक दावा केल्याने अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीच्या नव्या दाव्यांमुळे अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात माहिती देताना जॅकलीनने पुरावे नष्ट केले असल्याचे नमूद केले.
200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने कथित फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरच्या गुन्ह्यातील रक्कम जाणूनबुजून स्वीकारली आणि त्याचा वापरही केला, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे.
ED चा मोठा दावा
जॅकलिनच्या याचिकेला उत्तर देताना दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ईडीने हा युक्तिवाद केला होता. याचिकेत अभिनेत्रीने चंद्रशेखर याच्याविरोधातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांच्यासमोर ठेवण्यात आले आणि जॅकलीनच्या वतीने वकिलाने ईडीच्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला.
Sukesh Chandrashekhar प्रकरणात जॅकलीनचा ‘हात’
उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी ठेवली आहे. आपल्या उत्तरात, ईडीने दावा केला आहे की, जॅकलीन फर्नांडिस हिने चंद्रशेखरसोबतच्या आर्थिक व्यवहारांबद्दल सत्य कधीच उघड केले नाही आणि पुरावे मिळेपर्यंत तथ्ये नेहमी लपवून ठेवली. तिने त्याच्यासोबत पैशांची मजा केली अन् पुरावे संपवले.
दरम्यान, अभिनेत्री जॅकलीन सुरुवातीपासूनच स्वत:ला निर्दोष आणि पीडित म्हणवत होती. पण तिने चौकशीदरम्यान असेही भासवले नाही की तिला सुकेशने अडचणीत आणले आहे.
ईडीचे म्हणणे आहे की, जॅकलीनला सुकेशच्या गुन्ह्याची माहिती होती. याशिवाय तिला हे देखील माहिती होते की लीना मारिया ही त्याची पत्नी आहे. असे असतानाही तिने सुकेशसोबतचे नाते सुरू ठेवले.
News Title- ED has claimed in the Delhi High Court that Bollywood actress Jacqueline Fernandez is also involved in the Sukesh Chandrashekhar fraud case
महत्त्वाच्या बातम्या –
Vicky Jain | विकी जैनचा सुशांतबद्दल मोठा खुलासा; म्हणाला,”अंकिता आणि सुशांतमुळे..”
Manoj Jarange | सरकारचं टेंशन वाढलं, जरांगेंना संशय, पुन्हा केली मोठी घोषणा
Ashok Saraf | मोठी बातमी! अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर
Health Insurance असेल तर ही बातमी नक्की वाचा, आता होईल फायदाच फायदा
Jaya Bachchan | 50 वर्षांच्या संसारानंतर जया बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या “लग्नानंतर…”