Ashok Saraf | मोठी बातमी! अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashok Saraf | ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर

अशोक सराफ (Ashok Saraf) यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन् हसू, कधी आशयघन अभिनयाने डोळ्यांत टचकन् पाणी आणणारे, तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अशोक मामा सर्वांचे लाडके आहेत.

चित्रपटसृष्टीत येण्याआधी बँकेत करत होते काम

चित्रपटसृष्टीत येण्याआधी ते एका सरकारी बँकेत काम करत होते. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं बँकेत काम केले. 1974ला त्यांनी पहिला चित्रपट केला. आजही ते काम करतच आहेत. मराठी रंगभूमीसह मराठी आणि हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदानाबद्दल अशोक सराफ (Ashok Saraf) यांना हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे.

अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत या चित्रपटांमधील अशोक सराफ यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केलं आहे.

मला थोड्या वेळापूर्वी कळालं की, मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मला हा पुरस्कार मिळेल याची मला कल्पना नव्हती. मी चांगलं काम करतो, तुम्हाला माझं काम आवडतंय, ही माझ्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Health Insurance असेल तर ही बातमी नक्की वाचा, आता होईल फायदाच फायदा

Jaya Bachchan | 50 वर्षांच्या संसारानंतर जया बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या “लग्नानंतर…”

Hrithik Roshan | अभिनेता हृतिक रोशनने केली सर्वांत मोठी घोषणा!

Rule Change | 1 फेब्रुवारीपासून ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

“मापात रहा, कसला माज दाखवतो तू?, एका दणक्यात तुझं…”; पुष्कर जोगला ‘या’ अभिनेत्याने झापलं