Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट; इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pakistan | पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाकिस्तानमध्ये काही दिवसांतच सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, मात्र त्याआधीच तिथे एक मोठी हिंसक घटना घडली आहे. शेजारील देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (PTI) रॅलीमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. ही रॅली बलुचिस्तानच्या सिबीमध्ये होत होती. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मृत्यूमुखी पडलेले चार जण पीटीआय पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर या निकालाविरोधात ही रॅली काढण्यात आली होती.

इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार

निषेधाच्या रॅलीदरम्यानच हा स्फोट झाला, ज्यामध्ये इम्रान यांच्या पक्षातील 4 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. या घटनेची माहिती देताना पीटीआय पक्षाचे सरचिटणीस यांनी पक्षाची भूमिका मांडताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच मृतांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते असे त्यांनी सांगितले. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये स्फोटामुळे झालेल्या मोठ्या आवाजानंतर लोक घाबरलेले दिसत आहेत.

बॉम्ब स्फोटाची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनास्थळी मोठा आवाज झाल्यानंतर पीटीआय पक्षाच्या सदस्यांमध्ये गोंधळ उडाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पीटीआय नेते सालार खान काकर यांनी सांगितले की, पक्षाचे उमेदवार सद्दाम तरीन यांनी आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत हा स्फोट झाला.

 

Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट

जखमींवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, 8 फेब्रुवारीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नऊ दिवस आधी हा स्फोट झाला. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या घटनेची दखल घेतली असून बलुचिस्तानचे मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुख यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

News Title- A bomb exploded at an election rally in Pakistan, killing four members of former Prime Minister Imran Khan’s party
महत्त्वाच्या बातम्या –

Vicky Jain | विकी जैनचा सुशांतबद्दल मोठा खुलासा; म्हणाला,”अंकिता आणि सुशांतमुळे..”

Manoj Jarange | सरकारचं टेंशन वाढलं, जरांगेंना संशय, पुन्हा केली मोठी घोषणा

Ashok Saraf | मोठी बातमी! अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर

Health Insurance असेल तर ही बातमी नक्की वाचा, आता होईल फायदाच फायदा

Jaya Bachchan | 50 वर्षांच्या संसारानंतर जया बच्चन यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या “लग्नानंतर…”