Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Anil Babar passed away | शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar passed away) यांचे आज सकाळी (31 जानेवारी) आकस्मिक निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अलीकडेच त्यांनी सांगली येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शरद पवारदेखील उपस्थित होते. अनिल बाबर येथे येताच त्यांना जयंत पाटील यांनी बसण्यासाठी जागा दिली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकारणातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

‘पाणीदार आमदार’ म्हणून प्रचलित

पश्चिम महाराष्ट्रात आमदार अनिल बाबर (Anil Babar passed away) यांना ‘पाणीदार आमदार’ म्हणून ओळखले जाई. खानापूर-आटपाडी येथे पाण्याची कायमच टंचाई होती. जायकवाडी प्रकल्पातून या भागाला पाणी देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून त्यांनी प्रयत्न केले. पुढे या योजनेला ‘ टेंभू योजना’ असे नाव देण्यात आले.

सांगली जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे ते एकमेव आमदार होते. एकनाथ शिंदे यांच्या ते कायम जवळचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वच राजकीय पक्षाकडून शोक व्यक्त केला जात आहे.

अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास

7 जानेवारी 1950 रोजी आमदार अनिल बाबर (Anil Babar passed away) यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षीच म्हणजेच 1972 साली राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे सदस्य बनल्यानंतर ते आमदार झाले. 1990 साली अनिल बाबर आमदार म्हणून  विधानसभेवर निवडून आले होते.

यासोबतच त्यांनी 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष पदही भूषविले. 1990 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकत विधानसभेत प्रवेश केला.पुढे 2014 आणि 2019 अशा सलग दोन विधानसभा निवडणूकही त्यांनी जिंकल्या. यासोबतच त्यांनी साखर कारखाने आणि जिल्हा बँकमध्येही पद भूषविले.

News Title-  Shinde group MLA Anil Babar passed away

महत्त्वाच्या बातम्या –

“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Ram Mandir | 41 दिवस चालत गाठली अयोध्या; मुंबईच्या शबनमने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट; इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार

Ashok Saraf यांचा ‘सर्वोच्च’ सन्मान! महाराष्ट्र भूषण जाहीर; CM शिंदेंची घोषणा