Maratha resevation | मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी उचललं मोठं पाऊल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सगे-सोयऱ्यांना देखील मराठा समाजाचं (Maratha resevation) आरक्षण देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने दिलेल्या या निर्णयाच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

ओबीसींनी उचललं मोठं पाऊल

राज्य सरकारने सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे, तो संविधानाच्या विरोधात आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरेची ही व्याख्या बदलता येत नाही. असे नमूद करत मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha resevation) घेतलेल्या राज्य सरकारच्या भूमिकेला हायकोर्टात चॅलेंज करण्यात आलं आहे.

सगेसोयरे “व” गणगोत “यांच्या प्रतिज्ञा पत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारी च्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेतर्फे कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली आहे.

आमच्या वाट्याचं आरक्षण हे सरकार मराठा समाजाला (Maratha resevation) द्यायचा प्रयत्न करत आहे, अशी भूमिका घेत छगन भुजबळ यांनी सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र बोलावत अनेक बैठकी घेतल्या. त्यानंतर आता हायकोर्टात ही याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Maratha resevation | भुजबळांचा विरोध, आंदोलन करण्याची केली घोषणा

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने 26 जानेवारी रोजी कुणबी नोंदींवर आधारित सरसकट कुणबी म्हणून जातीची प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात हरकती व सूचना मागविणारी अधिसूचना काढली आहे. त्याला सर्वप्रथम अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला. त्यांनी ओबीसी संघटनांची बैठक बोलावून, या अधिसूचनेच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा केलीये.

या अधिसूचनेच्या विरोधात आता काँग्रेस नेते वडेट्टीवारही मैदानात उतरले आहेत. मंगळवारी त्यांनीही विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात या अधिसूचनेला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Ram Mandir | 41 दिवस चालत गाठली अयोध्या; मुंबईच्या शबनमने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट; इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार