Maratha Reservation | फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जरांगे झाले सावध; मराठा समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा समाजाच्या (Maratha Reservation) सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगून राज्य सरकारने अध्यादेश काढून तो मनोज जरांगे पाटील यांच्या हाती दिला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी काढलेला मोर्चा वाशी येथे दि. 27 जानेवारी रोजी संपला. यानंतर आता राज्यातून विविध संघटना आणि ओबीसी नेते टीका करत आहेत. तसेच सरकारमध्येच अर्धे विरोधात आणि अर्धे पाठींबा देतांना पाहायला मिळत आहे. सरकारमधून दोन भूमिका येत असल्याचं पाहायला मिळतंय.

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे जरांगे झाले सावध

ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळायला ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे पुरावा नाहीत अशा लोकांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.

Maratha Reservation | जरांगेंनी मराठा समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरूनदेखील त्यांनी मराठा समाजाला घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे. आम्ही सावध आहोत, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी मावळमध्ये व्यक्त केलं.

आरक्षणाचा (Maratha Reservation) हा कायदा 70 वर्षांचा आहे. हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे. सरसकट या शब्दाला काही होणार नाही. किती जण एकत्र आले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

सरकारमधील दोन भूमिका पुढे येवू लागल्याने 10 फेब्रुवारीलाच आंदोलन सुरु करणार आहे. एकीकडे सरकारच्या शिष्टमंडळाकडून अध्यादेश दिला जातो, आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार आहेत. सरकारमध्येच दोन भूमिका पाहायला मिळत आहे. त्यामुळे संशय येत आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.

गुलालाचा अपमान झाल्यास सरकारला जड जाईल. शिंदे समिती मराठवाड्यामध्ये काम करीत नाही. मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत. खालचे अधिकारी ऐकत नाहीत. विभागीय आयुक्तांनी सांगितल्यावर खाली हालचाल होते, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maratha resevation | मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी उचललं मोठं पाऊल!

Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Ram Mandir | 41 दिवस चालत गाठली अयोध्या; मुंबईच्या शबनमने व्यक्त केली ‘ही’ इच्छा