Pushkar Jog | अभिनेता पुष्कर जोगला (Pushkar Jog ) आता चांगलेच टार्गेट केले जात आहे. त्याने मराठा आरक्षणाबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली होती. यानंतर त्याच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. शासनाकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कागदपत्र पडताळणी केली जात आहे. यासाठी एक सर्व्हे केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
मात्र, त्याच्या या विधानाने एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं आहे. कालच अभिनेता किरण माने याने फेसबुक पोस्ट करत पुष्कर जोगला चांगलंच झापलं होतं. आता आज (31 जानेवारी) अजून एका अभिनेत्रीने त्याला सुनावले आहे. अभिनेत्री व लावणी क्वीन मेघा घाडगेने पुष्करच्या विधानाचा विरोध केला आहे.
अभिनेत्री मेघा घाडगेची पुष्कर जोगवर टीका
अभिनेत्री मेघा घाडगेने (Megha Ghadge) पुष्कर विरोधात इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी ठेवली आहे. यात तिने पुष्करला (Pushkar Jog) खडेबोल सुनावले. “जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार? बाई-माणूस नसत्या तर नक्कीच दोन लाथा मारल्या असत्या? तुला 2 लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघून मैत्री करणारा तू. विचारांमध्येच घाण. काय करणार?”, अशी पोस्ट मेघा घाडगेने केली आहे.
पुढे ती म्हणाली की, “अरे मित्रा…त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा लागतो. आजूबाजूला थोडी चौकशी करावी लागते! माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे, मी तुला नक्की पाठवेन. तेसुद्धा नको असेल तर तुझ्याच जातीचे माझे काही मित्र मैत्रिणी आहेत जे तुझ्या विचारसणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर… वा घाण…वा घाण…वा घाण…!” ,असा संताप मेघा घाडगेने व्यक्त केला आहे.
यापूर्वी अभिनेता किरण मानेनही त्याला सुनावले होते. तुला लाथाच घालायच्यात ना? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा? …मी तुला चॅलेंज देतो, ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचाऱ्याकडून चार लाथा खायच्या, बोल. आहे दम तुझ्या पार्श्वभागात?, असे आव्हानच किरण मानेने पुष्कर जोगला दिले होते.
पुष्कर जोगला टार्गेट का केलं जातंय?
मुंबई महापालिकेचे कर्मचारी याच सर्व्हेसाठी पुष्कर जोगच्या (Pushkar Jog ) घरी गेले होते. यावेळी त्याने सोशल मीडियावर स्टोरी अपलोड करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. “बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि सर्व्हे करतोय, म्हणून मला माझी जात विचारली. ते जर बाईमाणूस नसते तर दोन लाथ नक्कीच मारल्या असत्याघातल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका. अदरवाईज, जोग बोलनार नाहीत. तर डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार “, अशा आशयाची पोस्ट पुष्कर जोगने केली होती. यावरून आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
News Title- Megha Ghadge criticism of Pushkar Jog
महत्त्वाच्या बातम्या –
Rahul Gandhi | बिहारमध्ये न्याय यात्रेत मोठी दुर्घटना, राहुल गांधी थोडक्यात बचावले
Pushpa-2 Release Date | प्रतीक्षा संपली! अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ या दिवशी रिलीज होणार
Parambir Singh | परमबीर सिंग खंडणीप्रकरणी मोठी बातमी; सीबीआयचा अखेर खुलासा
Maratha resevation | मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी उचललं मोठं पाऊल!