Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांचं अत्यंत खळबळजनक वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची सगेसोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून याबाबत अधिसूचनादेखील काढण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना याबाबतचा अध्यादेश देऊन त्यांचं उपोषण सोडवलं होतं. पण सरकारच्या या अधिसूचनेवर आधी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आक्षेप घेतला असून ओबीसी संघटना या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत.

मनोज जरांगे पाटलांचं अत्यंत खळबळजनक वक्तव्य

ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असल्याने या अध्यादेशाला कोर्टात आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. यानंतर मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) मोठं वक्तव्य केलं आहे.

Manoj Jarange | “काही दगाफटका झाला तर…”

मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेशाबद्दल काही दगाफटका झाला तर मंडल आयोगालाच चॅलेंज कणार असून आपण वकीलांची लवकरच बैठक घेणार असल्याचं म्हटल्याने आता ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण तापलं आहे.

ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. भुजबळांनी उगाच असे चॅलेंज देऊ नये. त्यांच्या वयाचा आम्ही मान राखतो असं सांगत जरांगेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन केलंय…मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाने काळजी करू नये. आरक्षणाचं प्रकरण कोर्टात जरी गेलं तरी काही होणार नाही असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटना हायकोर्टात गेल्यात, सगेसोयरे आणि गणगोत शब्दावरून प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय.

मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी संघटना कोर्टात गेल्यात. तर जरांगेंनीही कायदेशीर लढाईची तयारी सुरु केलीय. त्यामुळे मराठा आरक्षण अधिसूचनेचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | ‘ते व्हायला नको होतं…’; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य

Maratha resevation | भुजबळांनंतर ‘हा’ बडा नेता मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक; आखला मोठा प्लॅन

‘ते थोडीच मागास आहेत?’; Manoj Jarange यांनी पुष्कर जोगला सुनावलं

Budget 2024 | बजेटआधी सरकारने दिली मोठी गुड न्यूज!

‘No Entry 2’ मधून सलमान खानलाच मिळाला डच्चू; नवीन कास्टची नावे ऐकून चाहत्यांना धक्का