‘No Entry 2’ मधून सलमान खानलाच मिळाला डच्चू; नवीन कास्टची नावे ऐकून चाहत्यांना धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

No Entry 2 | अभिनेता सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांचा ‘नो एंट्री’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी फूल कॉमेडी धमाका होता. तिघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटाची आजही चर्चा होते. आता या चित्रपटाचा दूसरा पार्ट (No Entry 2 ) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

तब्बल वीस वर्षांनंतर याचा सिक्वेल येणार आहे. अनीस बाजमी याचे दिग्दर्शन करणार आहेत. रिपोर्टसनुसार याच्या दुसऱ्या पार्टची कथा वेगळी असणार आहे. यासोबतच यात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांना चित्रपटातून डच्चू मिळाला आहे.

‘No Entry 2’ मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार

रिपोर्टनुसार , बोनी कपूर आणि जी स्टुडिओ या (No Entry 2) चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. अनीस बाजमी याला दिग्दर्शित करणार आहे. पण चित्रपटाची स्टारकास्ट पूर्णपणे बदलणार आहे. या चित्रपटात सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर यांच्याऐवजी वरूण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मात्र चित्रपटात अभिनेत्री कोण असणार याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. वरूण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ यांना चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली असून त्यांनी यात काम करण्यासाठी होकार दर्शवला आहे. अनीस बाजमी गेल्या सहा महिन्यांपासून या अभिनेत्यांना अनेकदा भेटले आहेत. 2024 मध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होऊ शकते. मात्र, याबाबत अधिकृत अशी कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘नो एंट्री’ मध्ये ‘या’ कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या

‘नो एंट्री’ हा चित्रपट 26 ऑगस्ट 2005 रोजी आला होतं. सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या नो एंट्रीने तेव्हा 74 कोटींहून अधिककमाई केली होती. या चित्रपटात सेलिना जेटली, बिपाशा बासू, लारा दत्ता आणि ईशा देओलसारख्या अभिनेत्री दिसल्या होत्या.

तसेच सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांच्या भूमिकाही बऱ्याच हीट झाल्या होत्या.हा विनोदी चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. मात्र, आता नवीन (No Entry 2 ) कास्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांकडून यात अगोदरचीच कास्ट घेण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.

News Title-  No Entry 2 will feature a new cast 

महत्त्वाच्या बातम्या –

Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Ram Mandir | 41 दिवस चालत गाठली अयोध्या; मुंबईच्या शबनमने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट; इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार