‘ते थोडीच मागास आहेत?’; Manoj Jarange यांनी पुष्कर जोगला सुनावलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मराठी अभिनेता पुष्कर जोग गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या मराठा जातीय सर्वेक्षण करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे महानगरपलिकेतील कर्मचारी घरोघरी जाऊन या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती गोळा करत आहेत. या वेळेस पुष्करच्या घरी देखील सर्वेक्षणासाठी गेले होते. दरम्यान यावेळी जात विचारल्यामुळे पुष्करने संताप व्यक्त करत त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी टाकली होती. त्याच्या या पोस्टवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे काय म्हणाले?

पुष्कर जोगच्या पोस्टमुळे त्याला अनेकांनी ट्रोल केलं. याचवेळी मनोज जरांगेंनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे म्हणाले की, जात सर्वेक्षणासाठी तुम्ही त्यांच्याकडे का गेलात? त्यांच्याकडे जायलाच नको होतं.

पुढे जरांगे म्हणाले त्यांच्याकडे संस्कार नाहीत. मागास सिद्ध करायला सरकारने समिती पाठवली आहे, मात्र, तिचा आपमान होत असेल तर ते बरोबर नाही. यानंतर ते म्हणाले की, तुम्ही त्यांच्याकडे जायचंच कशाला? त्यांच्याकडे काय कमी आहे? ते थोडीच मागास आहेत?, त्यांच्याकडे साऱ्या दुनियाचा पैसा आहे, असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

पुष्करने दिलगीरी व्यक्त केली

बीएमसीने त्याच्या पोस्टला विरोध करत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एका पत्राच्या माध्यमातून केली होती. ‘महानगरपालिका कर्मचारी हे मराठी सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अॅपनुसार माहिती विचारत असताना जात विचारल्यामुळे पुरुष कर्मचारी असता तर दोन लाथा घातल्या असत्या असं वक्तव्य मराठी सिने कलाकार पुष्कर जोग यांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुष्करने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची माफी मागून दिलगीरी व्यक्त केली.

पोस्टमध्ये पुष्कर काय म्हणाला?

जर बाईमाणूस नसते ना तर मग, 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या, असं पुष्कर म्हणाला. शिवाय कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार, असं म्हणत पुष्करने पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

News Title : manoj jarange gives reaction on pushkar jog post

महत्त्वाच्या बातम्या-

Rahul Gandhi | बिहारमध्ये न्याय यात्रेत मोठी दुर्घटना, राहुल गांधी थोडक्यात बचावले

Pushpa-2 Release Date | प्रतीक्षा संपली! अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ या दिवशी रिलीज होणार

Parambir Singh | परमबीर सिंग खंडणीप्रकरणी मोठी बातमी; सीबीआयचा अखेर खुलासा

Maratha Reservation | फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जरांगे झाले सावध; मराठा समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन

Maratha resevation | मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी उचललं मोठं पाऊल!