Maratha resevation | भुजबळांनंतर ‘हा’ बडा नेता मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक; आखला मोठा प्लॅन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha resevation | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला (Maratha resevation ) आता ओबीसीमधून आरक्षण दिले जाणार आहे. मात्र, या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी हायकोर्टात याविरोधात याचिका दखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता यानंतर काँग्रेसही आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरक्षणावर आक्षेप घेतला आहे. एकीकडे छगन भुजबळ यांनी 1 फेब्रुवारीला राज्यातील सर्व खासदार व आमदारांच्या घरांसमोर आंदोलन केले जाईल, अशी घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनीही मोठी घोषणा केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा

विजय वडेट्टीवार यांनी विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली असून या बैठकीत अधिसूचनेला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरील अधिसूचना काढली आहे. हा ओबीसी समाजावर मोठा अन्याय असून त्याला विरोध करण्यासाठी आम्ही येत्या 20 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे सभा घेणार, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

छगन भुजबळ 1 फेब्रुवारीला अहमदनगर येथे जाहीर मेळावा घेणार आहेत. तर, दुसरीकडे विजय वडेट्टीवारदेखील संभाजीनगर येथे विराट सभा घेणार आहेत. त्यामुळे सध्या राज्यात मराठा आरक्षणाचीच चर्चा होत आहे. आमच्या वाट्याचं आरक्षण सरकार मराठा समाजाला (Maratha resevation) द्यायचा प्रयत्न करत आहे, अशी भूमिका घेत छगन भुजबळ यांनी सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र बोलावत अनेक बैठकी घेतल्या.

मराठा आरक्षणाविरोधात अनेक ठराव

भुजबळ यांनी घेतलेल्या बैठकीत अनेक ठराव संमत करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाबाबतची (Maratha resevation) अधिसूचना रद्द करावी, मागासवर्ग आयोग रद्द करावा, शिंदे समिती रद्द करावी, मराठा कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती द्यावी, सगे सोयऱ्यांच्या मसुद्यावर हरकती नोंदवावी असे ठराव या बैठकीत घेण्यात आले.

याविरोधात भुजबळ महाराष्ट्रभर ओबीसी यात्रा काढणार आहेत. मात्र, भुजबळ यांच्या या भूमिकेला आता विरोधही केला जात आहे. सरकारमध्ये राहून लढण्यापेक्षा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडून लढावं, असे आव्हानच भुजबळ यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

News Title- Congress aggressive against Maratha resevation  

महत्त्वाच्या बातम्या –

Maratha Reservation | फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जरांगे झाले सावध; मराठा समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन

Maratha resevation | मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी उचललं मोठं पाऊल!

Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी