Nagpur News | राज्याची उपराजधानी नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना लाजिरवाणी आहे. खरं तर नागपुरात अलीकडेच झालेल्या खासदार औद्योगिक महोत्सवातील महिला स्वच्छतागृहात एका शिक्षकाने छुप्या पद्धतीने मोबाईलच्या मदतीने चित्रीकरण केले. हा किळसवाणा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ माजली. विशेष बाब म्हणजे हे लज्जास्पद कृत्य करणारा व्यक्ती हा एका नामांकित शाळेतील शिक्षक असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात खासदार औद्योगिक महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील गुंतवणूक वाढवणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता. त्यामुळे विदर्भासह विविध राज्यांतील लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार
या भव्य कार्यक्रमासाठी अनेक नामांकितांनी हजेरी लावली होती. प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली होती. पण, त्या ठिकाणी महिलांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहात काही महिला गेल्या असता त्यांना धक्कादायक प्रकाराचा सामना करावा लागला. महिला स्वच्छतागृहात गेल्या असता मागच्या खिडकीतून कोणीतरी मोबाईलद्वारे चित्रीकरण करत असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, एक इसम स्वच्छतागृहाचे चित्रीकरण करत असल्याचे समजताच संबंधित महिलांनी बाहेर येऊन ही माहिती पोलिसांना दिली. खिडकीतून लाजिरवाणे कृत्य करत असलेल्या व्यक्तीवर पोलिसांनी डोळा ठेवला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. पण तो तिथे कुठेच सापडला नाही.
Nagpur News आरोपीला बेड्या
दरम्यान, 29 जानेवारीला सांयकाळी पुन्हा एकदा एका महिलेने अशीच तक्रार केली. मग पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची मदत घेत संशयित व्यक्तीचा पुन्हा शोध सुरू केला. अधिक पोलिसांची फौज नेमली असताना व्यक्तीचा शोध लागला. संबंधित आरोपी व्हीआयपी गेटजवळ उभा असल्याचे दिसले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली. तेव्हा मोबाईलमध्ये स्वच्छतागृहातील अनेक महिलांचे फोटो आणि व्हिडीओ मिळाले. आरोपी मागील तीन दिवसांपासून हे कृत्य करत असल्याचे समोर आले. मग पोलिसांनी मंगेश खापरे या शिक्षकाला अटक केली आहे.
News Title- Mangesh Khapare, a teacher who photo and video a women’s toilet in Nagpur, has been arrested by the police
महत्त्वाच्या बातम्या –
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांकडून नवी घोषणा, तारीख सुद्धा केली जाहीर!
Shikhar Dhawan | लेकाच्या एका भेटीसाठी तरसतोय शिखर धवन, सर्वांसमोर सांगितलं दु:ख
‘बिग बॉस’ संपताच Ankita Lokhande ची खास पोस्ट, म्हणाली…
Benefits of milk | दुधाबरोबर हे ‘सात’ पदार्थ खाल्ल्याने मिळतील दुप्पट फायदे!