Cosmetic Clash: मेकअपच्या सामानावरुन सासू-सुनेत भांडण, सुनेनं उचललं धक्कादायक पाऊल

Cosmetic Clash । उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथं मेकअपसारख्या शुल्लक कारणावरून सासू-सुनेचं टोकाचे भांडण झालं. पती-पत्नीचा वाद घटस्फोटापर्यंत पोहचल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. पण, आग्रा येथील घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण इथं सुनेला मेकअप करण्याची खूप आवड होती. तिच्या मेकअपच्या वस्तूंना कोणी हात लावणेही तिला मान्य नव्हतं. मात्र, तिच्या सासूने तिचे मेकअप साहित्य वापरले अन् एकच खळबळ उडाली.

सासू-सुनेचं भांडण आग्रा येथील कुटुंब समुपदेशन केंद्रात पोहचले. खरं तर सासूने सुनेचं मेकअपचे साहित्य वापरल्याने कुटुंबात वाद चिघळला. मेकअपच्या कारणावरून रोज खटके उडत होते. ही बाब ऐकून कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या टीमलाही आश्चर्य वाटले. मग सासू आणि सून दोघींचे म्हणणे ऐकून घेऊन दोन्ही पक्षांना बराच सल्ला देण्यात आला आहे.

मेकअपच्या सामानावरुन सासू-सुनेत भांडण

दरम्यान, आग्रामधील मलपुरा परिसरात राहणाऱ्या दोन बहिणींचे लग्न फतेहाबादमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांशी झाले. दोन्ही भाऊ छोटी मोठी कामे करून उदरनिर्वाह करतात. लग्नानंतर दोन्ही बहिणींमधील एकीने आपल्या पतीला दारू पिण्याचे व्यसन असल्याचा आरोप केला होता. आता दुसऱ्या बहिणीने तिच्या सासूवर मेकअपच्या वस्तू वापरल्याचा आरोप केला आहे.

खरं तर या दोन बहिणींच्या लग्नाला एक वर्षही उलटले नाही आणि घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद सुरू आहेत. या प्रकरणी मोठी बहीण सांगते की, सासू तिच्या मेकअपच्या वस्तू रोज वापरते. यामुळे तिला कुठेतरी बाहेर जायचे असेल तर तिच्याकडे मेकअपचे साहित्य नसते. तिने अनेक वेळा सासूला मेकअप करण्यास मनाई केली आहे.

Cosmetic Clash अन् घटस्फोट

मलपुरा येथील रहिवासी असलेल्या या दोन्ही बहिणींचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, सासू जोपर्यंत मेकअप करत नव्हती तोपर्यंत सर्वकाही ठीक होते. मात्र, तिने चोरून मेकअपचे साहित्य वापरले म्हणून घरात भांडण होत आहे.

सासू आणि सुनेचे भांडण कुटुंब समुपदेशन केंद्रात पोहचले असता तेथील सल्लागार अमित गौर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. सुनेने घटस्फोटाची तीव्र इच्छा व्यक्त केल्याचे गौर यांनी नमूद केले. तसेच तिचा पती तिच्याशी नीट वागत नसल्याचेही तिने सांगितले. पती त्याच्या आईच्याच बाजूने बोलत असल्याचे म्हणत सुनेने घटस्फोटासाठी आग्रह धरला.

News Title- women and mother-in-law quarreled over the use of makeup in Agra, Uttar Pradesh, which led to divorce
 महत्त्वाच्या बातम्या –

Nagpur News: नागपुरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार, वासनांध शिक्षकाने…

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांकडून नवी घोषणा, तारीख सुद्धा केली जाहीर!

Kalyan News: मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांचं टेन्शन वाढलं, स्वतःच्या मतदारसंघातच पराभवाचा झटका बसणार?

Shikhar Dhawan | लेकाच्या एका भेटीसाठी तरसतोय शिखर धवन, सर्वांसमोर सांगितलं दु:ख

‘बिग बॉस’ संपताच Ankita Lokhande ची खास पोस्ट, म्हणाली…