Maratha resevation | ‘…तो अंतिम निर्णय नाही’; मराठा आरक्षणाबाबत भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha resevation | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना याबाबतचा अध्यादेश देऊन त्यांचं उपोषण सोडवलं होतं. पण सरकारच्या या अधिसूचनेवर आधी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

मराठा आरक्षणाबाबतच्या अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत. अधिसूचना अंतिम व्हायची आहे. अधिसूचनेतील आक्षेप घेताना, भुजबळ साहेब, सर्वांनी घेऊन, त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबद्दलची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Maratha resevation | काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

सरकारने सगेसोऱ्यांबाबत काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही. अधिसूचनेवर सरकारने हरकती आणि सूचना मागविल्या आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांना जिथे आंदोलन करायचं आहे ते करावं. आम्हाला काय अडचण नाही. त्यांची भूमिका बदलणार नाही. सगळं व्यवस्थित होईल. एकदा कायदा पारित होईपर्यंत थांबा. सगळं व्यवस्थित होईल, असं जरांगेंनी म्हटलंय.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सगे-सोयऱ्यांना देखील मराठा समाजाचं (Maratha resevation) आरक्षण देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने दिलेल्या या निर्णयाच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

राज्य सरकारने सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे, तो संविधानाच्या विरोधात आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरेची ही व्याख्या बदलता येत नाही. असे नमूद करत मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha resevation) घेतलेल्या राज्य सरकारच्या भूमिकेला हायकोर्टात चॅलेंज करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Pune News | पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली, आता क्रिकेटपटूला दणका देणाऱ्या डॅशिंग अधिकाऱ्याकडे पुण्याचा कारभार

Budget 2024 | अर्थसंकल्पाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर द्या लक्ष; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Paytm वापरत असाल तर सावधान!, RBIने या व्यवहारांवर घातली बंदी

Amitabh Bachchan: श्रीदेवीचा होकार मिळावा म्हणून अमिताभ यांनी उधळली होती ट्रकभर गुलाबाची फुलं

Cosmetic Clash: मेकअपच्या सामानावरुन सासू-सुनेत भांडण, सुनेनं उचललं धक्कादायक पाऊल