Interim Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजच्या अर्थसंकल्पात (Interim Budget 2024) सर्वसामान्य पासून कर्मचारी, महिला ते शेतकरी यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांसाठी करात मोठी सूटही जाहीर केली जाऊ शकते. यासोबतच कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातही वाढ अपेक्षित आहे. थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होईल. निर्मला सीतारामन यांचा हा सहावा आणि पहिला अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे.
महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता
सरकार अर्थसंकल्पामध्ये (Interim Budget 2024) महागाई भत्त्यात 4% ने वाढ जाहीर करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात वाढ केली जाईल.
कामगार ब्युरोने जाहीर केलेल्या AICPI निर्देशांकानुसार हा महागाई भत्ता 50 टक्के असू शकतो. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली, तर कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल आणि याची सुरुवात या चालू वर्षातच केली जाऊ शकते.
अर्थसंकल्पाकडे लागल्या सर्वांच्या नजरा
आजच्या अर्थसंकल्पमध्ये (Interim Budget 2024) सरकारने हा निर्णय घेतला तर, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के भत्ता दिला जाईल. मात्र त्यानंतर महागाई भत्ता शून्यावर येईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 50 टक्के डीए जोडला जाईल. म्हणजेच जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 18000 रुपये असेल, तर त्याला 50 टक्के म्हणजेच 9000 रुपये त्याच्या पगारात जोडले जातील.
त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आजच्या अर्थसंकल्पमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच सरकार शेतकरी आणि महिलांसाठी देखील मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. अंत सर्वांचेच लक्ष आजच्या या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.
News Title- Interim Budget 2024 7th Pay Commission
महत्त्वाच्या बातम्या –
Budget 2024 | अर्थसंकल्पाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर द्या लक्ष; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
Paytm वापरत असाल तर सावधान!, RBIने या व्यवहारांवर घातली बंदी
Amitabh Bachchan: श्रीदेवीचा होकार मिळावा म्हणून अमिताभ यांनी उधळली होती ट्रकभर गुलाबाची फुलं
Cosmetic Clash: मेकअपच्या सामानावरुन सासू-सुनेत भांडण, सुनेनं उचललं धक्कादायक पाऊल
Nagpur News: नागपुरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार, वासनांध शिक्षकाने…