LPG Gas Price | अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

LPG Gas Price | देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (1 फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, त्यापुर्वीच महागाईचा भडका उडाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी आजपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG Gas Price) वाढ केल्याने सर्व सामन्यांना मोठा झटका बसला आहे.

तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या म्हणजेच अनुदानित 14 किलो एलपी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केला गेला नाही. याचे नवे दर जारी करण्यात आले आहेत.

गॅस सिलेंडरचे नवे दर

तेल कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनुसार व्यावसायिक गॅसच्या दरात (LPG Gas Price) 14 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये याच व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्ये 30.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर, मागच्याच महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये ही किमत 2 रुपयांनी कमी केली होती.

आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी याच्या किमती वाढवल्या आहेत. काही वेळातच आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र, त्यापुर्वीच गॅसच्या दरात वाढ केल्याने हा मोठा फटका बसला आहे. आता अर्थसंकल्पात काय मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

देशातील इतर भागातील सिलेंडरचे नवे दर

तेल कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे आज दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडर (LPG Gas Price) 1769.50 रुपये, कोलकात्यात 1887 रुपये, चेन्नईत 1723.50 रुपये आणि मुंबईत आता 1723.50 रुपये असे दर आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सध्या 902.50 तर दिल्लीमध्ये 903, कोलकाता मध्ये 929 आणि चेन्नईमध्ये याच किमती 918.50 रुपये आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नसल्याने थोडा फार दिलासा मिळाला आहे.

News Title- LPG Gas Price increase from today

महत्त्वाच्या बातम्या –

Amitabh Bachchan: श्रीदेवीचा होकार मिळावा म्हणून अमिताभ यांनी उधळली होती ट्रकभर गुलाबाची फुलं

Cosmetic Clash: मेकअपच्या सामानावरुन सासू-सुनेत भांडण, सुनेनं उचललं धक्कादायक पाऊल

Nagpur News: नागपुरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार, वासनांध शिक्षकाने…

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांकडून नवी घोषणा, तारीख सुद्धा केली जाहीर!

Kalyan News: मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांचं टेन्शन वाढलं, स्वतःच्या मतदारसंघातच पराभवाचा झटका बसणार?