Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

Budget 2024 LIVE | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. अंतरिम अर्थसंकल्प 2024 साठी त्यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरू केलं आहे.

अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या उद्दिष्टांचा उल्लेख केला आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मोदी सरकारच्या व्हिजनबद्दल सांगितलं

देशातील जनता भविष्याकडे पाहत आहे. ते आशावादी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली, तेव्हा अनेक आव्हानं आमच्यासमोर होती. जनहितार्थ कामं सुरू केली आहेत. जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे- निर्मला सीतारमण

विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल. गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी सरकार काम करतंय- निर्मला सीतारमण

पंतप्रधान स्वनिधी योजनेचा अनेक लोकांना लाभ मिळाला . 25 कोटी लोकांसाठी विविध योजना राबवल्या. पीएम किसान योजनेचा 11 शेतकऱ्यांना फायदा. 80 कोटी लोकांना मोफत धान्यवाटप- निर्मला सीतारमण

देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. आमच्या सरकारचे पारदर्शक कारभारावर लक्ष आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी 3 कोटी घरे बांधली जातील- निर्मला सीतारमण

अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा

देशात नव्या मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात येणार.

9 ते 14 वर्षांच्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी लस दिली जाणार.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील.

1 कोटी घरांना सौरउर्जा देण्याचं ध्येय 

सामान्यांसाठी मोठी बातमी, आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही – निर्मला सीतारमण

महत्त्वाच्या बातम्या- 

Agriculture Budget 2024 | शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !

Interim Budget 2024 | “2047 पर्यंत भारत…”, निर्मला सीतारमण यांचं मोठं वक्तव्य

Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

LPG Gas Price | अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

Interim Budget 2024 | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .