Manoj Jarange | ‘तुरूंगात जाण्याची भिती…’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्याला सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवल्यानंतर मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केलाय. भुजबळांच्या आरोपांनंतर जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल. जरांगेंनी भुजबळांना चांगलंच सुनावलं आहे.

आव्हान देने हा त्यांचा धंदा आहे, मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी ते करतात. आमच्या अन्नात माती कालवली तर 27 टक्के आरक्षणाला आम्ही चॅलेंज करणार आहोत असंही जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना तुरूंगात जाण्याची भिती आहे म्हणून ते ओबीसी बांधवांची दिशाभुल करत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी भुजबळांवर केला आहे.

अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सभागृहात कायदा पारित करणं आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) सातत्यानं करत आहेत.

Manoj Jarange | सरकारच्या निर्णयानंतर ओबीसी आक्रमक

ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असल्याने या अध्यादेशाला कोर्टात आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांनीही सरकारच्या निर्णयावर जाहीर नापसंती दर्शवली आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या अकाऊंटवरून ओबसी समाजाला आवाहन करणारे मेसेजही व्हायरल केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | जरांगे पाटलांची थेट अर्थमंत्र्यांकडेच मोठी मागणी!

Gold Silver Rate | ग्राहकांना मोठा धक्का! सोन महागलं, जाणून घ्या दर

Union budget 2024 | अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर!

Budget 2024 | सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी; निर्मला सीतारमण यांची सर्वात मोठी घोषणा

Agriculture Budget 2024 | शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !