Gold Silver Rate | ग्राहकांना मोठा धक्का! सोनं महागलं, जाणून घ्या दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold Silver Rate | 2024 मध्ये सोने आणि चांदी यांच्या किंमतीत घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बातमी होती. मात्र, आज (1 फेब्रुवारी 2024) च्या दुसऱ्याच महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे आज केंद्राय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज देशाचं अर्थसंकलप सांगण्यापूर्वीच सोने-चांदीच्या नव्या किंमती समोर आल्या आहेत. बजेटनंतर सोने-चांदीच्या किंमतीत काय बदल होतो, याकडे सध्या ग्राहकांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं म्हटलं आहे.

सोनं महागलं

2024 च्या वर्षातील पहिल्या महिन्यात सोने-चांदीचे भाव (Gold-Silver Rate) कमी झाले होते. जानेवारीमध्ये सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र मागील दोन दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत 320 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार असल्याचं समोर आलं आहे.

याच बरोबर, 29 जानेवारीला 100 तर 30 जानेवारी रोजी 220 रुपयांची वाढ झाली. 31 जानेवारी रोजी भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Silver Rate | चांदीचे भाव

सोने चांदीच्या तुलनेत देखील चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 4400 रुपयांनी चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात 1000 रुपयांची तर या आठवड्यात 500 रुपयांची वाढ झाली. सोमवारी 29 जानेवारी रोजी 200 रुपयांची तर 30 जानेवारी रोजी 300 रुपयांची वाढ झाली. 31 जानेवारी रोजी किंमती स्थिर होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

असा असेल कॅरेटचा भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन महागल्याचं म्हटलं आहे तर, चांदीची किंमतीत घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोने 62,685 रुपये, 23 कॅरेट 62434 रुपये, 22 कॅरेट सोने 57,420 रुपये झाले. 18 कॅरेट 47,014 रुपये, 14 कॅरेट सोने 36,671 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. एक किलो चांदीचा भाव 71,668 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : gold silver rate expensive most important news for customers

महत्त्वाच्या बातम्या-

Agriculture Budget 2024 | शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !

Interim Budget 2024 | “2047 पर्यंत भारत…”, निर्मला सीतारमण यांचं मोठं वक्तव्य

Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

LPG Gas Price | अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

Interim Budget 2024 | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!