Union budget 2024 | अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Union budget 2024 | मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Union budget 2024) आज (1 फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. आजच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अंगणवाडी सेविका, सहाय्यक आणि आशा कामगारांना सरकारने मोठी खुशखबर दिली.

आता अंगणवाडी सेविका, सहाय्यक आणि आशा कामगारांना आयुष्मान योजनेत समाविष्ट केले जाणार आहे. यामुळे आशा सेविकांना अनेक लाभ मिळणार आहेत. त्यांना मोफत उपचार मिळणार आहेत. यासोबतच देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही सुविधा मिळणार आहेत.

9 कोटी महिलांच्या जीवनमानात बदल होणार

सरकारने (Union budget 2024) आयुष्यमान योजनेत (Ayushman Bharat Yojana) आशा सेविकांना समाविष्ट केल्याने आता कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढील पाच वर्षांत 3 कोटी ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. देशात आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिला लखपती दीदी झाल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले.

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 9 कोटी महिलांच्या जीवनमानात बदल होणार आहे. योजनेत महिलांच्या आरोग्य सेवेसाठी देशातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच या योजनेअंतर्गत पात्र धारकांना रुग्णालयात प्रवेशापूर्वी एक आठवडा आणि डिस्चार्ज झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत वैद्यकीय चाचण्यांसाठी खर्च दिला जाणार आहे.

कर्करोग रोखण्यासाठी मोफत लसीकरण

आयुष्यमान भारत योजनेमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सरकारने लसीकरण विकसित केले आहे. महिलांनी याची लस मोफत दिली जाणार आहे. या योजनेत कर्करोग आणि किडनीच्या आजारासह अनेक गंभीर आजारवर उपचार केले जातात. आता आशा सेविकांचा यात समावेश करण्यात आल्याने त्यांना मोठा फायदा मिळणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये (Union budget 2024) सर्वसामन्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने सौर योजनाची मोठी घोषणा केली आहे. या अंतर्गत सोलर रूफटॉप योजना सुरू केली जाणार असून त्यात सहभागी कुटुंबाला 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. यासाठी 15 हजार रुपयांच अनुदानही दिले जाणार आहे.

News Title- Union budget 2024 Anganwadi workers under Ayushman Bharat

महत्वाच्या बातम्या- 

Budget 2024 | सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी; निर्मला सीतारमण यांची सर्वात मोठी घोषणा

Agriculture Budget 2024 | शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !

Interim Budget 2024 | “2047 पर्यंत भारत…”, निर्मला सीतारमण यांचं मोठं वक्तव्य

Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

LPG Gas Price | अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडरच्या दरात वाढ