Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर, अखेर खरा मास्टरमाईंड सापडला

Sharad Mohol | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येनंतर या प्रकरणी आतापर्यंत अनेक खुलासे झालेत. काही आरोपींना कोथरूड पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत असताना आता मास्टरमाईंड म्हणून विठ्ठ्ल शेलार आणि गणेश मारणे यांचं नाव समोर आलं आहे.

शरद मोहोळ हत्येचा म्होरक्या अखेर गजाआड

अशातच वाशी आणि पनवेल पोलिसांनी नवी मुंबईमध्ये लपून बसलेल्या विठ्ठल शेलारला 15 जानेवारी दिवशी ताब्यात घेतलं. याबरोबर आणखी एक मुख्य सुत्रदार गणेश मारणे हा फरार झाला होता, मात्र पुणे पोलिसांनी बुधवारी गणेश मारणेच्या मुसक्या आवळल्या आहेत. संगमनेरजवळ नाशिक रोड येथे मारणेसह तिघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली आहे.

शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणामध्ये मास्टरमाईंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांचं नाव समोर आलं आहे. शेलार आणि मारणे यांनी शरद मोहोळचा खून होण्याआधी एक मीटिंग घेतली असल्याची माहिती कोथरूड पोलिसांनी दिली आहे. यावेळी कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक झाली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे.

Sharad Mohol | ‘या’ चुकीमुळे मारणे पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान मोहोळवर गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोरांनी मारणेच्या नावाने आरडाओरड केली. यामुळे कोथरूड पोलिसांनी मास्टरमाईंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांचा पाठलाग करणं सुरूच ठेवलं. हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 15 हून अधिक आरोपींची नावं कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

गणेश मारणेला अटकपूर्व जामीन नाही

गणेश मारणेनं पोलिसांना गुंगारा देऊन पुणे पोलिस सत्र न्यायालयाला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मारणेच्या वकिलांनी मुख्य तक्रारीमध्ये गणेश मारणेचं नाव नसल्याचं सांगितलं. तर पहिल्या रिमांड अहवालामध्ये गणेश मारणेला फरारी म्हणून घोषित केलं नाही. यामुळे गणेश मारणेला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी युक्तीवाद करण्यात आला. मात्र तसं झालं नाही, मोहोळवर झालेल्या गोळीबारावेळी हल्लेखोरांनी मारणेचं नाव घेतलं होतं. यामुळे प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झालं. यामुळे बाजू ऐकल्याशिवाय मारणेला अटकपूर्व जामीन देता येणार नसल्याचं न्यायलयानं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Jackie Shroff | माधुरी दीक्षितसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल जॅकी श्रॉफ यांचा मोठा खुलासा; म्हणाले..

Ramayana | रणबीर कपूर बनणार ‘राम’ तर सीतेच्या भुमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Manoj Jarange | ‘तुरूंगात जाण्याची भिती…’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange | जरांगे पाटलांची थेट अर्थमंत्र्यांकडेच मोठी मागणी!

Gold Silver Rate | ग्राहकांना मोठा धक्का! सोन महागलं, जाणून घ्या दर