Rashmika Mandanna | “तो माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा आधार…”, रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rashmika Mandanna |‘अॅनिमल’ या चित्रपटामध्ये रणबीर कपूरसोबत साऊथ स्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दिसून आली होती. यातील तिच्या भूमिकेचे सर्वत्रच कौतुक झालं. रणबीर आणि रश्मिकाची जोडी चांगलीच हीट झाली. आपल्या अदाने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. यासोबतच तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही ती कायम चर्चेत असते.

रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Actor Vijay Deverakonda) रिलेशनशिपमध्ये असल्याचं नेहमी म्हटलं जातं. आता नुकताच तिने विजयसोबतच्या बॉन्डबद्दल मोठा खुलासा केला. रश्मिकाने विजयचं भरभरून कौतुकही केलं. सध्या तीच्या या वक्तव्याची अधिक चर्चा होत आहे.

“माझ्यासाठी विजूचं मत नेहमीच महत्वाचं आहे”

एका मुलाखती दरम्यान रश्मिकाला (Rashmika Mandanna) तिच्या सहकलाकरांबरोबर असलेल्या नात्याबद्दल प्रश्न करण्यात आला. यामध्ये रणबीर कपूर (अ‍ॅनिमल), विजय देवरकोंडा (गीता गोविंदम), सिद्धार्थ मल्होत्रा (मिशन मजनू) आणि अल्लू अर्जून (पुष्पा) यांच्या नावाचा समावेश होता. यावर तिने विजयबद्दल मोठं विधान केलं.

“विजू आणि मी सोबत मोठे झालो आहोत, त्यामुळे मी माझ्या आयुष्यात जे काही करते, त्यात त्याचंही योगदान आहे. मी त्याचा प्रत्येक गोष्टीत सल्ला घेते. मला नेहमी त्याचं मत जाणून घ्यायचं असतं आणि तो प्रत्येक गोष्टीत मी म्हणेन ते बरोबर असं म्हणणारा नाही. माझ्यासाठी त्याचं मत नेहमीच महत्वाचं असतं”, असं रश्मिका म्हणाली.

“विजय नेहमी स्पष्ट बोलणारा आणि वागणारा आहे. ‘हे चांगलं आहे’, ‘हे वाईट आहे’, ‘मला याबद्दल असं वाटतं’ असं तो नेहमीच स्पष्टपणे सांगून टाकतो. माझ्या आयुष्यात कोणीही मला इतका पाठिंबा दिला नसेल, जितका विजयने दिला आहे. म्हणून मी त्याचा खूप सन्मान करते”, असं रश्मिका म्हणाली आहे. तिने विजयचं कौतुक केल्यामुळे त्यांच्यातील बॉन्ड स्पष्ट दिसून येत आहे.

सोशल मिडिया पोस्टमुळे रश्मिका आणि विजय कायम चर्चेत

अभिनेत्री रश्मिका (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा यांनी ‘गीता गोविंदम’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटापासूनच ते प्रेमात असल्याचं बोललं जातं. बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळेही ते दोघे कायम चर्चेत असतात. मात्र त्यांनी कधीच अधिकृतपणे आपण नात्यात असल्याचं म्हटलं नाही. मात्र त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावते. त्यांनी केतर यावे, अशी त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे.

News Title-  Rashmika Mandanna big statement

महत्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | ‘तुरूंगात जाण्याची भिती…’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange | जरांगे पाटलांची थेट अर्थमंत्र्यांकडेच मोठी मागणी!

Gold Silver Rate | ग्राहकांना मोठा धक्का! सोन महागलं, जाणून घ्या दर

Union budget 2024 | अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर!

Budget 2024 | सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी; निर्मला सीतारमण यांची सर्वात मोठी घोषणा