सह्याद्रीतील अनमोल रत्न, महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यावर दिसते 7 रंगांची माती!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याने अजरामर झालेलं ठिकाण म्हणजे रायरेश्वर. अनेक दुर्गप्रेमी रायरेश्वर पठाराला (Raireshwar pathar) भेट देतात. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या मंदिरात जाऊन आजही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जयघोष केला जातो.

एकाच ठिकाणी दिसते 7 रंगांची माती

रायरेश्वर (Raireshwar pathar)  किल्ला पुण्यातील भोर तालुक्यात येतो. अतिशय दुर्गम परिसरात असलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक वारसा लाभलाय. याच किल्ल्यावर वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी अर्थात 27 एप्रिल 1645 रोजी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर हे बारा मावळातील सवंगडी होते.

रायरेश्वराच्या उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर किल्ले दिसतात. याशिवाय वातावरण चांगलं असेल तर प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगडही दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच किल्ल्यावर 7 रंगांची माती दिसते.

गेल्या काही वर्षांत रायरेश्वराच्या मंदिराबरोबरच पठारावर बहरणारे रानफुलांचे ताटवे अन् सप्तरंगी मातीने पर्यांटकांसाठी कुतूहल निर्माण केलंय. त्याच बरोबर या सप्तरंगी मातीमागे कित्येक वर्षांतील घडामोडींचा इतिहासही लपला आहे.

रायरेश्वर किल्ला दोन जिल्ह्यांच्या सीमेवर

रायरेश्वर किल्ला पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर उभा आहे. या किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या टेकडीवर जाणारी वाट झाडाझुडपातून जाते. ही झुडपं पार करुन जेव्हा आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो तेव्हा समोरचं दृष्य पाहून अवाक् होतो.

या रंगीत टेकडीवरील माती जांभळी आहे. खालच्या बाजूला असलेल्या मातीचा रंग पिवळसर आहे तर वरच्या बाजूला असणारी माती लाल आहे. पलिकडे असणारी माती गुलाबी झाली आहे तर खालच्या बाजूला या मातीचा रंग करडा होत गेला आहे. जवळपास सात ते आठ मातीचे रंग इथे दिसतात.

रायरेश्वरावर गेल्यावर पांडवकालीन शिवमंदिर, सात रंगाची माती, पांडवकालीन लेणी, गोमुखकूंड, छान असा सूर्योदय आणि सूर्यास्त, अस्वलखिंड (नाकिंदा) ही ठिकाणं नक्की पाहा. तर मित्रांनो मग कधी करताय रायरेश्वर प्लॅन? कमेंटमध्ये नक्की सांगा.

महत्त्वाच्या बातम्या-

नॅशनल क्रश Tripti Dimri अडकणार लग्नबंधनात?; म्हणाली ‘माझा नवरा’…

Rashmika Mandanna | “तो माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा आधार…”, रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य

Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर, अखेर खरा मास्टरमाईंड सापडला

Jackie Shroff | माधुरी दीक्षितसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल जॅकी श्रॉफ यांचा मोठा खुलासा; म्हणाले..

Ramayana | रणबीर कपूर बनणार ‘राम’ तर सीतेच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री