राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं, छत्रपती संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhatrapati sambhajiraje |  लोकसभा निवडणुकांचे वारे आता राज्यामध्ये वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली चढाओढ पाहायला मिळत आहे. येत्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट घडणार असल्याची चिन्हे आता समोर येऊ लागली आहेत. कोल्हापूरच्या गादीचे वारसदार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये संभाजीराजे?

एका बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. राज्यसभेचे माजी खासदार म्हणून संभाजीराजे यांनी काम केलं आहे. सध्या सुरू असलेली चर्चा सत्यात उतरली तर राज्याच्या राजकारणातील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. याबरोबर संभाजीराजेंना महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत सर्वांचं एकमत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संभाजीराजे यांना दीड वर्षांआधी शिवसेनेकडून ऑफर आली होती, मात्र काही अटी संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांना न पटल्यानं त्यांनी नकार दिला. अशातच आता पुन्हा एकदा संभाजीराजे राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना तसेच कॉंग्रेसमध्ये निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.

स्वराज्य पक्षाचे संस्थापक-

संभाजीराजे हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांचा स्वत:चा पक्ष असून त्यांनी स्वत: महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केल्यास पक्षालाही महाविकास आघाडीसोबत युती करावी लागेल. याबाबत महाविकास आघाडीचं एकमत आहे. मात्र संभाजीराजे यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

संभाजीराजे यांना कोल्हापूरची जागा?

कोल्हापूरची जागा ही संभाजीराजे यांनाच निवडणुकीसाठी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांद्वारे समोर आली आहे. तसेच त्यांना निवडणुकीसाठी आपल्या पक्षासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस यांमध्ये प्रवेश करावा लागणार किंवा या पक्षांशी आपल्या स्वराज्य पक्षासोबत युती करावी लागणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर अद्यापही संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

…तर सत्ताधाऱ्यांच्या डोकेदुखीत होणार वाढ-

सध्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फुटले आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांचं पारडं जड झालेलं पाहायला मिळत असून त्यावर मात करण्यासाठी महाविकास आघाडीनं संभाजीराजे हा पर्याय निवडल्याची माहिती सुत्रांद्वारे समोर येत आहे. जर असं घडल्यास राजकीय वर्तुळामध्ये ट्विस्ट घडण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापूरच्या जागेसाठी सत्ताधाऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ होऊ शकते.

News Title: Chhatrapati Sambhajiraje will enter in mahavikas aghadi

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला फोन नंबर, ‘हे’ कारण आलं समोर

सह्याद्रीतील अनमोल रत्न, महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यावर दिसते 7 रंगांची माती!नॅशनल क्रश Tripti Dimri अडकणार लग्नबंधनात?; म्हणाली ‘माझा नवरा’…

Rashmika Mandanna | “तो माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा आधार…”, रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य

Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर, अखेर खरा मास्टरमाईंड सापडला

नॅशनल क्रश Tripti Dimri अडकणार लग्नबंधनात?; म्हणाली ‘माझा नवरा’…