Chhagan Bhujbal | “छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?, भाजपवाल्यांनो… कुठं फेडाल हे पाप?”, एका पोस्टमुळे मोठी खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. मागील काही दिवसांपासून दोघे एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत. जरांगे यांच्या विरोधात भुजबळांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी मागणी भुजबळ यांची आहे.

मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या असे म्हणणाऱ्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर देखील नाराजी व्यक्त केली होती. ते सरकारमध्ये मंत्री असतानाही सातत्याने सरकारविरोधात बोलत आहेत. आगामी काळात ते ओबीसींची सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. अशातच भुजबळ भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

एका पोस्टमुळे मोठी खळबळ

छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बडा चेहरा म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या राजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, भुजबळ राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे, त्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावरील एक पोस्ट. मुंबईत धडकू पाहणाऱ्या मराठा आंदोलकांची नवी मुंबईत भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तूर्त जरांगेंच्या आंदोलनाला ब्रेक लावला.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मराठ्यांनी आंदोलन थांबवले. शिंदेंनी नवी मुंबईतील मोर्चाला मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले. परंतु, भुजबळांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. त्यामुळे भुजबळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा आहे.

Chhagan Bhujbal भाजपच्या वाटेवर?

सततच्या सरकारविरोधी भूमिकेनंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी छगन भुजबळांवर सडकून टीका केली. त्यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करण्याची शिवसेना आमदारांनी मागणी केली. याच्या दुसऱ्याच दिवशी भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

 

अंजली दमानिया यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटले, “भुजबळ भाजपच्या वाटेवर? एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप.”

शिवसेना पक्षातून भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाली होती. सेनेतील एक आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती. 1991 मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसचा हात पकडला. 1999 मध्ये शरद पवारांसोबत जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सध्या ते अजित पवार गटात असून, त्यांच्याकडे राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

News Title- A post by social activist Anjali Damania has fueled discussions about NCP leader and minister Chhagan Bhujbal joining the BJP
महत्त्वाच्या बातम्या –

‘त्या भुजबळच्या… लई माज आलाय त्याला’, आमदाराची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ

‘येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात…’; सर्वसामान्य नागरिकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं, छत्रपती संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला फोन नंबर, ‘हे’ कारण आलं समोर

सह्याद्रीतील अनमोल रत्न, महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यावर दिसते 7 रंगांची माती!