Pune News: दरवाजाबाहेर चावी लपवून ठेवत असाल तर सावधान!, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Pune News | कोणत्याही कामासाठी घराबाहेर जाताना दरवाजाजवळ चावी ठेवायची अनेकांना सवय असते. किंबहुना तिथे चावी ठेवल्याने घरातील इतर सदस्य कोणत्याही क्षणी घरी आल्यास त्यांना घर उघडण्यासाठी सोयीस्कर होते. कारण आपण इथे चावी ठेवत असल्याचे घरातल्या सर्वच सदस्यांना माहित असते. पण, दरवाजाजवळ चावी ठेवल्यामुळे पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील वाघोली परिसरातील एका कुटुंबाला या सवयीमुळे मोठी किंमत मोजावी लागली आहे.

कुटुंबीय रोज चावी कुठे लपवतात यावर चोरट्यांनी पाळत ठेवली. घरातल्यांनी नेहमीप्रमाणे बाहेर जाताना चावी दरवाजाजवळ ठेवली होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी करून 1.38 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू पळवून नेल्या. वाघोली भागातील आव्हाळवाडी रस्ता येथील 29 वर्षीय नीरज अमदास येमुल यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर घटना उघडकीस आली.

दरवाजाबाहेर चावी लपवून ठेवत असाल तर सावधान

चोरीच्या घटनेच्या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत चोरी आणि घरफोडीचा गुन्हा दाखल केला. स्थानिक पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांना घटनेच्या ठिकाणाहून मिळालेल्या इतर खुणा तपासून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

तक्रारदार येमुल हे शहरातील एका नामांकित आरोग्य सेवा चाचणी युनिटमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी 2 ते 5.45 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी सांगितले की, येमुल हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात.

Pune News धक्कादायक प्रकार समोर

अज्ञात चोरट्यांनी घराबाहेरील शू रॅकमध्ये ठेवलेली चावी घेऊन घरफोडी केल्याचे दिसते. दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी मौल्यवान वस्तू लंपास केल्या. सोन्या-चांदीचे दागिने, इतर मौल्यवान वस्तू आणि रोकड असा एकूण १.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला.

येमुल यांनी घरातून निघताना नेहमीप्रमाणे कुलूप लावून चावी शू रॅकेटमध्ये ठेवली. तीन तासांनंतर कुटुंबीय घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. कपाट फोडलेल्या अवस्थेत होते, याशिवाय मौल्यवान वस्तू गायब असल्याचे त्यांना आढळले. मग लगेचच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत आहेत. तसेच संशयितांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

News Title- Thieves stole valuables worth Rs 1.38 lakh by taking a key hidden near the door of a house in Pune’s Wagholi
महत्त्वाच्या बातम्या –

Chhagan Bhujbal | “छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?, भाजपवाल्यांनो… कुठं फेडाल हे पाप?”, एका पोस्टमुळे मोठी खळबळ

‘त्या भुजबळच्या… लई माज आलाय त्याला’, आमदाराची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ

‘येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात…’; सर्वसामान्य नागरिकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं, छत्रपती संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला फोन नंबर, ‘हे’ कारण आलं समोर