बजेटनंतर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर्षी सरकारने शेतकरी, महिला, आरोग्य तसेच इतर घटकांसाठी मोठ्या घोषणा केल्या. याचा सोने-चांदीवरही (Gold-Silver Rate Today) मोठा प्रभाव झाला आहे. बजेटमुळे सोन्याच्या भावात तेजी आली आहे. तर, चांदीचे भाव मात्र घसरले आहेत.

जाणून घ्या आजचे दर

वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये (Gold-Silver Rate Today) सोने 2200 रुपयांनी कमी झाले होते. अखेरच्या आठवड्यात त्यात मोठी वाढ दिसली. 31 जानेवारीला हाच भाव स्थिर राहिला. त्यानंतर मात्र दोन दिवसांनी 320 रुपयांनी पुन्हा सोन्याने भरारी घेतली. आता बजेटनंतर सोने 170 रुपयांनी महागले आहे.

त्यानुसार 22 कॅरेट सोने 58,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,590 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर,चांदीचे भाव उतरले आहेत. चांदीच्या किमतीमध्ये 200 रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीचा भाव 76,300 रुपये झाला आहे.

जानेवारीमध्ये चांदीत तब्बल 4400 रुपयांची घसरण झाली होती. मात्र, अखेरच्या आठवड्यात त्यात 2 हजारांची वाढ झाली. आज त्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे एक किलो चांदीसाठी तुम्हाला 76,300 रुपये मोजावे लागणार आहेत.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) नुसार (Gold-Silver Rate Today) 24 कॅरेट सोन्यासाठी 62,599 रुपये द्यावे लागतील. तर, 23 कॅरेट सोने 62348 रुपये, 22 कॅरेट सोने 57,341 रुपये झाले आहे. यासोबतच 18 कॅरेट सोने 46,949 रुपये, 14 कॅरेट सोने 36,620 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

तर, एक किलो चांदीचा भाव 70,834 रुपये झाला असून वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लावला जात नही. सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने याचे भाव कमी जास्त होत असतात.

News Title- Gold-Silver Rate Today

महत्त्वाच्या बातम्या –

“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”

Maratha Reservation: मराठा समाजाविरोधात कोर्टात धाव घेतलेल्या ओबीसी संघटनांना मोठा झटका

‘तू आमदार तुझ्या घरी, पाय उखडून टाकायला कार्यकर्ते….’; रूपाली पाटील भडकल्या

Rain Update: पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालणार!, राज्याच्या ‘या’ भागांना पावसाचा इशारा

Maratha Reservation: सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही!, राज्य शासनाची विनंती मागासवर्ग आयोगाने फेटाळली!