“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange patil)  हे सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत. काही महिन्यांपासून ते सरकारविरोधात आरक्षणाचा लढा लढत होते. यावेळी सरकारने आध्यादेश सादर केल्यानं मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये समावेश करून घेण्याबाबतची मूळ मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. मात्र यावर अनेक दिवसांपासून ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) सरकारकडे केली होती आता यावर मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर हल्ला चढवला आहे.

लक्ष्मण हाकेंचा हल्ला

मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर टीकेची तोफ डागली आहे. ते नवराष्ट्र या माध्यमाशी बोलत असताना त्यांनी मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांची आरक्षण मागण्याची औकात नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Manoj Jarange Patil “एकनाथ शिंदे यांचं नोटीफेकेशन बेकायदेशीर”

मराठा समाजाला कुणबी समाजातील आरक्षण द्यावं अशी मागणी सरकारकडे मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. याविरोधामध्ये ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचं लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेलं नॉटिफेकेशन बेकायदेशीर आणि घटनेविरोधात असून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती ओबीसी समाजाच्या घटक प्रवर्गावर अन्याय करणारी आहे”.

“सुप्रीम कोर्ट हात सुद्धा लावणार नाही”

राज्य मागासवर्गाचं सध्या सर्वेक्षण सुरू आहे. ते सर्वेक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टीकणारं नाही. कारण त्यांची प्रश्नावली सुमार दर्जाची आहे. माहिती गोळा करून तुम्ही काय करणार आहात. हवे ते प्रश्न विचारले गेले आहेत. सुप्रीम कोर्ट तुमच्या सर्वेक्षणाला अजिबात हात सुद्धा लावणार नाही, अशा कडक शब्दात लक्ष्मण हाके यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

“मनोज जरांगे-पाटील यांची आरक्षण मिळवण्याची औकात नाही”

मराठा समाजाकडून अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत. मात्र मनोज जरांगे हे ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत असल्यानं ओबीसी समाज या आरक्षणाला विरोध करत आहे. यावर आता मनोज जरांगेंची लक्ष्मण हाके यांनी औकात काढली आहे.

“मनोज जरांगेंना सुरूवातीला आम्ही पाठिंबा दिला. सुरूवातीला गरजवंतांचा लढा त्यावर विचारवंत विचार करतील असं वाटत होतं, मात्र तसं झालं नाही. मनोज जरांगे-पाटील यांची आरक्षण मिळवण्याची औकात नाही”, असा शाब्दिक हल्ला लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

News Title – Manoj jarange patil not capable about maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या

‘त्या भुजबळच्या… लई माज आलाय त्याला’, आमदाराची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ

‘येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात…’; सर्वसामान्य नागरिकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं, छत्रपती संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला फोन नंबर, ‘हे’ कारण आलं समोर

सह्याद्रीतील अनमोल रत्न, महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यावर दिसते 7 रंगांची माती!