Maharashtra Weather Alert | देशासह राज्यात उष्णतेचा कहर दिसून येत आहे. तापमान प्रचंड वाढलं आहे. काही ठिकाणी तर पारा हा 40च्याही पुढे गेला आहे. आता राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, रायगडसह मराठवाडा विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे घरच्या बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना आहेत.
खूप महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तसंच घराबाहेर जातांना टोपी, रुमाल, स्कार्फ, गॉगल लाऊन बाहेर पडावे आणि सोबत पाण्याची बॉटल ठेवावी असं आवाहन करण्यात आलंय.
‘या’ जिल्ह्यात सूर्य कोपणार
कोकणातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस वातावरण उष्ण व दमट राहील. मुंबई व रायगडला आज तर ठाण्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.
यासोबतच मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व नांदेडला देखील उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस यलो अलर्ट (Maharashtra Weather Alert) देण्यात आला आहे.
‘या’ भागात पावसाची शक्यता
दरम्यान, वातावरणाच्या खालच्या स्थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही दक्षिण पुर्व मध्य प्रदेश ते कर्नाटक पर्यंत जात आहे. ही द्रोणीका रेषा विदर्भ आणि मराठवाड्यातून जात आहे. त्यामुळे आज कोकण व मध्य महाराष्ट्र सोडता मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यातील तापमान कसं राहील?
पुण्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. पुण्यात काल 30 एप्रिल रोजी 41.7 डिग्री सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. पुण्याच्या तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याने नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असं सांगण्यात आलंय.
News Title- Maharashtra Weather Alert
महत्वाच्या बातम्या-
‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील
पन्नास खोके, एकदम ओके… कोल्हापुरी ठसक्यातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा Video
मावळात अनुभव पडतोय कमी, नवख्या उमेदवारामुळे ठाकरे गटाची दमछाक!
S E X स्कँडल प्रकरणी पहिली मोठी कारवाई; प्रज्वल रेवन्नाला मोठा झटका
चाणक्यानी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी आयुष्यात यश मिळवण्यासाठी करतील मदत