पीएफ खात्यात पैसे जमा झाले की नाही?, कसं तपासणार?; जाणून घ्या सविस्तर

EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफवरील व्याज वाढवण्यास मंजुरी दिली असून या वाढीव व्याजदराचा 7 कोटींहून अधिक लोकांना लाभ मिळणार आहे. EPFO ने PF खातेधारकांसाठी 8.25 टक्के व्याज मंजूर केलं आहे.त्यामुळे करोडो पीएफ खातेधारक त्यांच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा होण्याची वाट बघत आहेत.

पीएफ खातेधारकांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 8.15 टक्के आणि 2021-22 मध्ये 8.10 टक्के दराने व्याज मिळत होते. मात्र, आता आर्थिक वर्ष 2023-24 साठी PF वर 8.25 टक्के दराने व्याजदर मंजूर करण्यात आला आहे. या व्याजाची घोषणा होऊन अनेक दिवस लोटले आहेत.मात्र, अद्याप खातेधारकांना याचे पैसे मिळाले नाहीत. आता ईपीएफओ खातेधारकांना त्यांचे व्याजाचे पैसे खात्यात जमा झाले की नाही, हे तपासता येणार आहे. आता ते कसं तपासणार, याबाबत या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.

मार्च 2024 पर्यंत आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफओने देशभरातील 28.17 कोटी ईपीएफ सदस्यांना व्याज दिलं होतं. खातेधारकांनी हे व्याज जमा झाले आहे का? ते तपासून घ्यावं असं ईपीएफओने सांगितलं होतं.

खात्यावर पैसे आले की नाही?, असं तपासा

उमंग अॅप : सर्वप्रथम तुम्ही खात्यात व्याज जमा झालं की नाही ते तपासण्यासाठी उमंग अॅपची मदत घेऊ शकता.हे अॅफ डाऊनलोड केल्यानंतर लॉग इन करावे आणि तेथे व्याज जमा झाले आहे की नाही हे तपासावे.

EPFO संकेतस्थळ : खातेधारकांनी या संकेतस्थळावर जाऊन इम्प्लॉईज लॉगीन हा ऑप्शन निवडावा.त्यानंतर सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक करावे. या सेक्शनमध्ये जाऊन मेंबर पासबुक यावर क्लीक करावे. त्यानंतर ( EPFO Interest )तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड, कॅप्चा टाकावा. त्यानंतर तुम्हाला पासबुकवर व्याज जमा झाले आहे की नाही हे समजेल.

SMS सुविधा : तुम्हाला 7738299899 या मोबाईल क्रमांकावर “EPFOHO UAN” असा मेसेज टाकावा लागेल. त्यानंतर 9 भाषांपैकी कोणत्याही भाषेत तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती मिळू शकते.

मिस्ड कॉल : खातेधारकांनी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईपीएफओ खात्याची माहिती दिली जाईल.

News Title- EPFO ​​Interest Balance Check Tips

महत्वाच्या बातम्या-

‘या’ भागांत सूर्य आग ओकणार! हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट

‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील

पन्नास खोके, एकदम ओके… कोल्हापुरी ठसक्यातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा Video

मावळात अनुभव पडतोय कमी, नवख्या उमेदवारामुळे ठाकरे गटाची दमछाक!

S E X स्कँडल प्रकरणी पहिली मोठी कारवाई; प्रज्वल रेवन्नाला मोठा झटका