Narendra Modi | लोकसभा निवडणुकीमुळे प्रचाराला रंगत आली आहे. देशात भाजपविरुद्ध इंडिया आघाडी असा सामना होत आहे. सध्या आपल्या पक्षातील तसंच युतीमधील उमेदवारांसाठी नेते प्रचारांचा धडाडा लावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राहुल गांधी थेट मैदानात उतरले आहेत.
मोदी यांनी महाराष्ट्र दौराही केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर प्रचंड टीका केली.तसंच शरद पवार यांच्या कृषीमंत्री असताना तसंच सत्तेत असतानाच्या कार्यकाळातील अनेक मुद्यांवरुन मोदींनी टोलेबाजी केली. अशात पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणामधील एका सभेत मोठं वक्तव्य केलं आहे.
मागे मोदी यांनी काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यास वारसा कर लादून हिंदूंची संपत्ती अधिक मुले असणाऱ्या म्हणजे मुस्लीम समाजात वाटली जाईल, असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी मुस्लीम समाजाबाबत विधान केलं आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही. तसंच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही.”, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi ) म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी कॉँग्रेसवर निशाणा साधत टीकाही केली. “संसदेचे काम चालू नये म्हणून त्यांनी (कॉँग्रेस) गोंधळ घातला. ते निवडणूक आयोग, ईव्हीएमवर संशय घेतात आणि आता मतपेटीसाठी संविधानाचा अपमान करत आहेत. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत दलित, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्या वाट्याचे आरक्षण मुस्लिमांना धर्माच्या आधारावर मिळू देणार नाही”, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
तेलंगणातून दुप्पट कर वसूल करून दिल्लीला..
राजकीय वर्तुळात सध्या मोदी यांचं हे विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी एका चित्रपटाचा उल्लेख करत कॉँग्रेसवर अनेक आरोपही केले. “तेलगू चित्रपटसृष्टीने भारताला RRR सारखा सुपरहिट चित्रपट दिला. पण आज तेलंगणा काँग्रेसने राज्यातील जनतेवर डबल ‘आर’ कर लादला आहे. ट्रिपल आर म्हणजेच RRR चित्रपटाने जगभरात भारताची मान उंचावली. मात्र दुप्पट आर करामुळे भारताची बदनामी होत आहे.”, अशी टीका नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी केली. त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याची चर्चा सध्या होत आहे. रेवंत रेड्डी यांनी तेलंगणातून दुप्पट कर वसूल करून तो दिल्लीत (कॉँग्रेसकडे) पाठवला जात असल्याचा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
News Title- Narendra Modi says No Reservation Based On Religion To Muslims
महत्वाच्या बातम्या-
‘या’ भागांत सूर्य आग ओकणार! हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट
‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील
पन्नास खोके, एकदम ओके… कोल्हापुरी ठसक्यातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा Video
मावळात अनुभव पडतोय कमी, नवख्या उमेदवारामुळे ठाकरे गटाची दमछाक!
S E X स्कँडल प्रकरणी पहिली मोठी कारवाई; प्रज्वल रेवन्नाला मोठा झटका