महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा; सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold-Silver Rate Today | आज 1 मे रोजी ग्राहकांना आनंदवार्ता मिळाली आहे. बेशकिंमती धातूंनी मार्च आणि एप्रिल महिना गाजवला. या दोन महिन्यात किंमतीने अनेक विक्रम तोडले. आज महाराष्ट्र दिनी सोने आणि चांदीने स्वस्ताईची वर्दी दिली.

काल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशीही ग्राहकांना दिलासा मिळाला होता. 30 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी घसरले. एप्रिलच्या अखेरच्या सत्रात सोने 2400 रुपयांनी स्वस्त झाले तर 1150 रुपयांची दरवाढ नोंदविण्यात आली.

सोने-चांदीचे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदी दोन्हीने दिलासा दिला आहे.

गेल्या आठवड्यात चांदीने 2 हजारांची उडी घेतली होती. नंतर त्यात 4500 रुपयांनी घसरण झाली. 30 एप्रिल रोजी चांदी किलोमागे 500 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.

कॅरेटचा भाव ‘असा’ असेल

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),24 कॅरेट सोने 71,710 रुपये, 23 कॅरेट 71,423 रुपये, 22 कॅरेट सोने 65,686 रुपये झाले. 18 कॅरेट 53,783 रुपये, 14 कॅरेट सोने 41,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today May 1

महत्त्वाच्या बातम्या-

“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना..”; पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

पीएफ खात्यात पैसे जमा झाले की नाही?, कसं तपासणार?; जाणून घ्या सविस्तर

‘या’ भागांत सूर्य आग ओकणार! हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट

‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील

पन्नास खोके, एकदम ओके… कोल्हापुरी ठसक्यातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा Video