मृत्यूनंतर पुनम पांडेच्या वैवाहिक आयुष्याबाबत झाला सर्वात मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Poonam Pandey  | अभिनेत्री पुनम पांडेने (Poonam Pandey) आज (2 फेब्रुवारी) जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिचं निधन झालं. गेल्या कित्येक दिवसांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर तिचा हा संघर्ष अपयशी ठरला. याबाबत पुनम पांडेच्या मॅनेजरने माहिती दिली आहे. तिच्या निधनानंतर आता तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत बोललं जात आहे. अभिनेत्री असूनही तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला होता.

अभिनेत्री कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ शोमध्ये पूनमने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने आपल्या आयुष्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. तिला वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला होता.

पतीच्या परवानगीशिवाय बाहेर पडणंही झालं होतं कठीण

पुनमने (Poonam Pandey ) सॅम बॉम्बे नामक व्यक्तीसोबत संसार थाटला होता. मात्र, त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. सॅम बॉम्बे तिला बेदम मारहाण करायचा, या हिंसचाराची ती बळी ठरली होती. यामुळे तिला ब्रेन हॅमरेजचा आजार झाला होता. पतीच्या परवानगीशिवाय तिला घराबाहेर पडणंही अवघड झालं होतं.

सॅम तिला प्रचंड मारहाण करायचा. याच्या जखमा पुनम मेकअप करून लपवायची. आज तिच्या निधनामुळे या गोष्टींवरही चर्चा होत आहे. सोशल मिडियावर तिचे अनेक चाहते आहेत. निधनाची बातमी कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पुनम पांडेचं निधन

दरम्यान, पुनम पांडेच्या (Poonam Pandey) इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या निधनाची एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टद्वारे पुनमच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. तिच्या अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

पुनमवर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर उपचार सूर होते. तिचा हा कर्करोग शेवटच्या टप्प्यावर आला होता. ती यूपीमधील तिच्या गावी होती आणि तिथून उपचार घेत होती. मात्र, मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली.

News Title-  Poonam Pandey Personal life

महत्त्वाच्या बातम्या –

शरद मोहोळच्या हत्येनंतर पत्नी स्वाती मोहोळचा धक्कादायक दावा!

पूनम पांडेचा झाला मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद

बिल्डरांच्या मनमानीला चाप लागणार, सर्वसामान्यांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय!

“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”