Poonam Pandey Death | कायमच वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री पुनम पांडेने आज (2 फेब्रुवारी) जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिचे निधन झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर तिचा हा संघर्ष अपयशी ठरला. याबाबत पुनम पांडेच्या मॅनेजरने माहिती दिली आहे.
पुनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टद्वारे पुनमच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. या बातमीमुळे बॉलीवुडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. तिच्या अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पुनम पांडेची शेवटची पोस्ट
“आजची सकाळ आमच्यासाठी अत्यंत कठीण आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपण आपली लाडकी पूनम गमावली आहे. यांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रेमाने भेटली. या दुःखाच्या वेळी, आम्ही तुम्हाला गोपनीयतेची विनंती करत आहोत. आम्ही शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीतून तिची आठवण आमच्यासोबत कायम राहील.”, अशी पोस्ट पुनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर करण्यात आली आहे.
View this post on Instagram
पूनम काही काळापासून कॅन्सरने ग्रस्त होती. तिचा कर्करोग शेवटच्या टप्प्यात होता.ती यूपीमधील तिच्या गावी होती आणि तिथून उपचार घेत होती. तिचे अंतिम संस्कारही तेथेच होणार आहेत. याबाबत अधिक तपशील मिळणे बाकी आहे.
पुनमने निधनाच्या दोन दिवसांपूर्वीच एक पोस्ट केली होती.’White & black: the yin and yang that balance my life’, अशा आशयाची पोस्ट तिने केली होती. आज तिच्या निधनाची बातमी समोर आली. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काहीना तर यावर विश्वासच बसत नाहीये.
‘त्या’ दाव्यामुळे पुनम पांडे होती चर्चेत
पूनम पांडे ही खूप प्रसिद्ध मॉडेल होती. 2011 क्रिकेट विश्वचषक फायनलपूर्वी तिने एका व्हिडिओत वचन दिले की होते की,भारत अंतिम सामना जिंकल्यास आपले कपडे काढून टाकेल. तिच्या या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती. या दाव्यामुळे ती पहिल्यांदाच वादात आली. तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, पूनम पांडे शेवटची कंगना रणौतच्या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती.
News Title- Poonam Pandey Death
महत्त्वाच्या बातम्या –
IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद
बिल्डरांच्या मनमानीला चाप लागणार, सर्वसामान्यांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय!
“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”
Maratha Reservation: मराठा समाजाविरोधात कोर्टात धाव घेतलेल्या ओबीसी संघटनांना मोठा झटका
‘तू आमदार तुझ्या घरी, पाय उखडून टाकायला कार्यकर्ते….’; रूपाली पाटील भडकल्या