IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Babar Azam | पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये अलीकडेच दिसला होता. वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबरला पाकिस्तानच्या संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाची धुरा शान मसूदच्या खांद्यावर सोपवली तर शाहीन आफ्रिदीला ट्वेंटी-20 संघाचे कर्णधार बनवले. बाबर आझम मात्र मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतो.

सोशल मीडियावर फार सक्रिय नसलेल्या बाबरने गुरूवारी #askbabar च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक प्रश्न पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींसाठी खास होता. खरं तर एका चाहत्याने बाबरला आयपीएल की पीएसएल असा प्रश्न केला. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग म्हणून आयपीएलची ख्याती आहे.

बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती?

भारतातील युवा खेळाडूंना स्वत:ची क्षमता दाखवून देण्याचे मोठे व्यासपीठ म्हणजे आयपीएल. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये जगभरातील नामांकित खेळाडूंची फौज दिसते. पाकिस्तानमध्ये देखील आयपीएलच्या धरतीवर पाकिस्तान सुपर लीग खेळवली जाते. आयपीएलच्या तुलनेत ही लीग खूप लहान असली तरी शेजारील देशात पीएसएलची चांगली क्रेझ आहे.

बाबर आझमने दोन ट्वेंटी-20 लीगबद्दल बोलताना सांगितले की, आयपीएल ही मोठी लीग आहे, जगभरातील जवळपास सर्वच खेळाडू तिथे खेळले आहेत. पण, मी पाकिस्तान सुपर लीगला अधिक प्राधान्य देईन. कारण ही लीग प्रसिद्धीच्या बाबतीत आयपीएलपेक्षा मागे असली तरी इथे खूप काही शिकता येते. त्यामुळे मला आयपीएलपेक्षा पीएसएल चांगली वाटते, असे बाबरने नमूद केले.

Babar Azam चा चाहत्यांसोबत मनमोकळा संवाद

दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये नो एन्ट्री आहे. आयपीएलच्या सुरूवातीच्या हंगामात केवळ पाकिस्तानी खेळाडू दिसले होते. मात्र, नंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलपासून दूर घेऊन गेले. पाकिस्तानी खेळाडू हसन अलीने अलीकडेच आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.

वन डे विश्वचषकानंतर पाकिस्तानी संघाला बहुतांश सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. नवनिर्वाचित कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वात शेजाऱ्यांना ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने 3-0 ने एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानला पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला.

News Title- Babar Azam has said that he likes Pakistan Super League more than Indian Premier League
महत्त्वाच्या बातम्या –

बिल्डरांच्या मनमानीला चाप लागणार, सर्वसामान्यांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय!

“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”

Maratha Reservation: मराठा समाजाविरोधात कोर्टात धाव घेतलेल्या ओबीसी संघटनांना मोठा झटका

‘तू आमदार तुझ्या घरी, पाय उखडून टाकायला कार्यकर्ते….’; रूपाली पाटील भडकल्या

Rain Update: पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालणार!, राज्याच्या ‘या’ भागांना पावसाचा इशारा