‘तू आमदार तुझ्या घरी, पाय उखडून टाकायला कार्यकर्ते….’; रूपाली पाटील भडकल्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत असतील, मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, अशी खोचक टीका संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केली. त्यांच्या या टीकेला अगदी तशाच शब्दांत उत्तर रुपाली पाटील यांच्याकडून देण्यात आलं आहे.

“अन्यथा त्यांचे पाय उखडून टाकायला…”

संजय गायकवाड यांना अशी वक्तव्य करायला रोखलं पाहिजे. अन्यथा त्यांचे पाय उखडून टाकायला कार्यकर्ते खंबीर आहेत. छगन भुजबळ हे कशाला पाहिजे?, असं म्हणत रूपाली पाटील यांनी संजय गायकवाड यांना इशारा दिला आहे.

तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल. तू आमदार तुझ्या घरी, बोलताना नीट बोललं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे. अन्यथा सत्तेतील कुस्ती लोकांना पाहायला मिळेल, असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी देखील संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. संजय गायकवाडांचे वक्तव्य संतापजनक आहे. त्यांचे वक्तव्य चुकीचं आहे, असं म्हटलंय.

Sanjay Gaikwad काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींची बाजू लावून धरली आहे. भुजबळ यांच्या या भूमिकेवर शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तर भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

महत्त्वाच्या बातम्या-

Rain Update: पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालणार!, राज्याच्या ‘या’ भागांना पावसाचा इशारा

Maratha Reservation: सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही!, राज्य शासनाची विनंती मागासवर्ग आयोगाने फेटाळली!

Pune News: दरवाजाबाहेर चावी लपवून ठेवत असाल तर सावधान!, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Chhagan Bhujbal | “छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?, भाजपवाल्यांनो… कुठं फेडाल हे पाप?”, एका पोस्टमुळे मोठी खळबळ

‘त्या भुजबळच्या… लई माज आलाय त्याला’, आमदाराची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ