‘तुमचा सेवक म्हणून…’; सुनील तटकरेंनी मतदारांना दिला शब्द

रायगड | राजपुरी पंचायत समिती गणाची जाहीर सभा पार पडली. या सभेला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंनी संबोधित केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मत्स्य योजना यापूर्वी कधी आणली गेली नाही अशी योजना देशाच्या पंतप्रधानांनी आणली आहे. या योजनेमध्ये अनेक व्यक्तिगत लाभार्थ्यांना, अनेक जेट्टींना थेटपणे अनुदान देण्याच्या योजना आहेत. हा सुनिल तटकरे तुमचा सेवक म्हणून या योजना राजपुरीच्या गणात आणण्यासाठी वचनबद्ध आहे, असा शब्द सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) मतदारांना दिला.

सुनील तटकरेंनी मतदारांना दिला शब्द

परंपरागत शेकडो वर्षे मच्छीमार बांधव मच्छीमारीचा व्यवसाय करत आले, त्यांच्याबद्दल कोणतीही चुकीची पद्धत खपवून घेतली जाणार नाही. माझ्या मच्छीमार बांधवांचा व्यवसाय सुरक्षित राहण्यासाठी जे काही करायचे असेल ते सर्व काम महायुती म्हणून सामुदायिक करणार आहोत. ती आमची बांधिलकी असणार आहे, असं तटकरे (Sunil Tatkare) म्हणालेत.

पर्यटनावर आधारित रोजगार वाढेल. अद्यावत जेट्टी आपण एवढ्याचसाठी करत आहोत की याठिकाणी मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला बघण्यासाठी शिवप्रेमी, पर्यटक येतील. अशावेळी पायाभूत सुविधा करण्यासाठी पावले उचलत आहोत. मच्छीमार बांधवांवर अन्याय होत असेल, नुकसान भरपाई देण्याबाबत काही कमतरता रहात असेल तर ती भरुन काढण्यासाठी पुढच्या कालावधीत शंभर टक्के काम करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर हा परिसर बदलणार आहे. या बदलणार्‍या प्रवाहाबरोबर स्थानिक माणूस ठळकपणे दिसला पाहिजे. अनेक प्रकल्प येतात. उद्याच्या भविष्यात जे जे प्रकल्प येतील त्यामध्ये शंभर टक्के इथला भूमीपुत्र राहिल याची खबरदारी घेणार आहोत, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.

“सर्व जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत”

एक हजार कोटीची जेट्टीची कामे महायुतीच्या माध्यमातून सुरू आहेत. यामध्ये अद्ययावत पद्धतीची जेट्टी मिळणार आहे. मच्छीमारी व्यवसाय सुरक्षित राहील. राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज उभे केले जातील. सरकारला एक हजार कोटी रुपयांचे परकीय चलन या काबाडकष्ट करणार्‍या माझ्या मच्छीमार बांधवांमुळे मिळते. मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम सागरमाला योजनेतंर्गत नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे. च्या सर्व जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास तटकरेंनी (Sunil Tatkare) व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा; सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना..”; पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

पीएफ खात्यात पैसे जमा झाले की नाही?, कसं तपासणार?; जाणून घ्या सविस्तर

‘या’ भागांत सूर्य आग ओकणार! हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट

‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील