‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश, मिळणार मोठी जबाबदारी

Rupali Ganguly | गेल्या काही दिवसांपासून राजकारण वेगळ्या वळवणार चाललेलं दिसत आहे. कारण राजकारणात आता सिनेसृष्टीतील कलाकार वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अनेक बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री राजकीय क्षेत्रात एन्ट्री करताना दिसत आहेत. बाॅलिवूडमधील सुप्रसिद्ध अभेनेता गोविंदाने देखील मागच्या काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र सध्या चर्चा आहे ती, अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या पक्ष प्रवेशाची.

काय आहे प्रकरण?

बाॅलिवूडमधील ड्रामा क्वीन कंगना रानौतने भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान कंगनाला भाजपने उमेदवारी देखील दिली. एवढंच नाही तर, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी या लोकसभेत निवडून गेल्या आहेत. त्या केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने भाजपमध्ये प्रवेश केला.

रुपालीचा भाजपमध्ये प्रवेश-

अनुपमा फेम रुपाली गांगुलीने (Rupali Ganguly) भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. विनोद तावडे आणि अनिल बुलानी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. रुपाली सोशल मीडियावर कायम स्क्रिय असते. काही दिवसांपूर्वी रुपालीने आपल्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता.


रुपालीने (Rupali Ganguly) व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर फॅन गर्ल मोमेंट असल्याचं म्हटलं होतं. अनुपमाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तिच्यावर स्टार प्रचारकाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आज 1 मे 2024 रोजी ‘अनुपमा’ फेम रुपालीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, ती सध्या ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकरत आहे.

रुपालीने व्यक्त केलं मनोगत-

पक्ष प्रवेश झाल्यानंतर रुपालीने आपलं मनोगत व्यक्त केलं. ती म्हणाली की, ‘मी जेव्हा हा विकासाचा महायज्ञ पाहिला तेव्हा मला अशी जाणीव झाली की मलाही यात सहभागी झालं पाहिजे. मला तुमच्या आशीर्वाद आणि सोबतीची गरज आहे. फक्त जे काही मी कारेन ते योग्य आणि चांगलं असेल.

News Title : Rupali Ganguly joins bjp party

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुमचा सेवक म्हणून…’; सुनील तटकरेंनी मतदारांना दिला शब्द

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा; सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना..”; पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

पीएफ खात्यात पैसे जमा झाले की नाही?, कसं तपासणार?; जाणून घ्या सविस्तर

‘या’ भागांत सूर्य आग ओकणार! हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट