गॅस सिलेंडरबाबत मोठी अपडेट; किमतीत झाला मोठा बदल

LPG Gas Cylinder | देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. अनेकांचं लक्ष हे या लोकसभा निवडणुकीकडे लागलं आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झालं आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे येत्या 7 मे रोजी होणार आहे. अशातच आता विरोधकही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गॅसच्या दरावरून हल्ला करत आहेत. आता गॅसच्या किंमतीबाबत एक माहिती समोर आलीये. (LPG Gas Cylinder)

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतील दरात 9 मार्च रोजी 200 रूपयांनी घट झाली. एप्रिल महिन्यामध्ये व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीत घट झाली होती. याचा ग्राहकांना दिलासा मिळालाय.

व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग दुसऱ्यांदा दिलासा मिळाला आहे. मात्र म्हणावा तसा मोठा दिलासा मिळाला नाही. देशातील चारही महानगरात व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीत घसरण दिसून आलीये.

चार महानगरांमध्ये व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट

देशाची अर्थिक राजधानी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत 19 रूपये दरात घसरण दिसून आली. या तिन्ही महानगरामध्ये 1745.50 रुपये, 1698.50 रुपये आणि 1911 प्रति गॅस सिलेंडर दर झाला. तर कोलकता येथे गॅस सिलेंडरचा भाव हा 20 रूपयांनी कमी झाला. (LPG Gas Cylinder)

चार महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर किंमती जवळपास 50 रूपयांनी कमी झाल्या. दिल्लीत 49.5 रूपयांनी गॅसच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोलकत्यात 52 रूपये, व्यवसायिक गॅसच्या किंमतीत दिल्ली आणि चेन्नई येथे 49.5 रूपयांनी गॅस सिलेंडरच्या किंमती स्वस्त करण्यात आल्या. मुंबईत दोन महिन्यात 50.5 रूपयांनी गॅसच्या किंमतीत घट झाली.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती स्थिर

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग दुसऱ्यांदा कोणताच बदल दिसला नाही. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रूपयांनी घट झाली. तेव्हापासून किंमत ही स्थिर आहे. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 803 रुपये, कोलकतामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नईत हा भाव 818.50 रुपये आहे.

News Title – LPG Gas Cylinder Rate Update

महत्त्वाच्या बातम्या

पीएफ खात्यात पैसे जमा झाले की नाही?, कसं तपासणार?; जाणून घ्या सविस्तर

‘या’ भागांत सूर्य आग ओकणार! हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट

‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील

पन्नास खोके, एकदम ओके… कोल्हापुरी ठसक्यातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा Video

मावळात अनुभव पडतोय कमी, नवख्या उमेदवारामुळे ठाकरे गटाची दमछाक!