‘…त्या दोघांपासून जीवाला धोका’; स्वाती मोहोळचा खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad mohol case | पुण्यातील गुंड शरद मोहोळ (Sharad mohol case) याची त्याच्याच घरासमोर गोळ्या झाडून 5 जानेवारी रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुख्य आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत रोजच नवं नवीन खुलासे होत आहेत. अशातच आता थेट शरद मोहोळच्या पत्नीने केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ माजली आहे.

स्वाती मोहोळ यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याचे स्वाती मोहोळ यांनी जबाबात म्हटले आहे. त्यामुळे पुण्यातील वातावरण पुन्हा एकदा गंभीर झाले आहे. शरदच्या हत्येमध्ये साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे यांनाच मुख्य सूत्रधार समजले जात होते.

शरद मोहोळच्या पत्नीचा धक्कादायक दावा

मात्र, गणेश मारणे हा मुख्य आरोपी म्हणून समोर आला आहे. याच्याकडूनच मोहोळ (Sharad mohol case) कुटुंबाला धोका असल्याचा दावा स्वाती मोहोळ यांनी केला आहे. आरोपी गणेश हा तीन आठवड्यापासून फरार होता. अखेर त्याला नाशिक येथे बेड्या ठोकल्या गेल्या. त्याने लपण्यासाठी केरळ, ओडिशा, कर्नाटक या राज्यांचा सहारा घेतला. मात्र, अखेर तो पोलिसांच्या ताब्यात आला.

गणेश मारणे याच्यावर यापूर्वी कोणताही आरोप नाही. 2008 पासून त्याच्यावर एकही गुन्हा नाही. त्याच्या वकिलांनी या प्रकरणामध्ये गणेशला गोवण्यात आल्याचा दावा केला आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

शरद मोहोळ हत्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

गणेशवर आठ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे त्याला पोलिस कोठडीमध्येच ठेवावे, अशी मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.मात्र, त्याच्याकडून आपल्याला धोका असल्याचा दावा स्वाती मोहोळ यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण वर आले आहे.

दरम्यान, शरद मोहोळवर (Sharad mohol case) गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोरांनी मारणेच्या नावाने आरडाओरड केली होती. यामुळे कोथरूड पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांचा पाठलाग करणं सुरूच ठेवलं. घटनेप्रकरणी आतापर्यंत एकूण 15 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

News Title-  Sharad mohol case Shocking claim of Swati Mohol

महत्त्वाच्या बातम्या –

Maratha Reservation: सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही!, राज्य शासनाची विनंती मागासवर्ग आयोगाने फेटाळली!

Pune News: दरवाजाबाहेर चावी लपवून ठेवत असाल तर सावधान!, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Chhagan Bhujbal | “छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?, भाजपवाल्यांनो… कुठं फेडाल हे पाप?”, एका पोस्टमुळे मोठी खळबळ

‘त्या भुजबळच्या… लई माज आलाय त्याला’, आमदाराची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ

‘येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात…’; सर्वसामान्य नागरिकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा