Sharad Pawar | थोर पुरुषांची तुलना अनेक राजकीय नेत्यांशी होताना दिसत आहे. काही दिवसांआधी आयोध्येमध्ये श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. यावेळी या सोहळ्याला संबोधित करत असताना श्रीराम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली होती. यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावर शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) संदर्भ दिला.
काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
वणी येथे असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आयेध्येमध्ये नरेंद्र मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली यामुळे देशभरातून टीका केली जात आहे. असं माध्यमांनी विचारलं असता “विरोधी पक्ष असल्यानं टीका करणं हा त्यांचा भाग आहे. टीका केल्या शिवाय ते पुढील निवडणूक लढवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे दैदिप्यमान असल्यानं त्यांची तुलना नरेंद्र मोदींशी करत असतील”, असं त्या म्हणाल्या आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) देखील उल्लेख केला आहे.
नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली याबाबत माध्यमांनी विचारलं असता शर्मिला ठाकरे यांनी शरद पवारांचा संदर्भ देत वक्तव्य केलं आहे. “शरद पवारांना त्यांच्या पक्षातील लोकं जाणता राजा म्हणतात, मात्र आपण जाणता राजा कोणाला म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो,” असं म्हणत शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. यानंतर त्यांनी 1 फेब्रुवारीला झालेल्या बजेटबाबत आपलं मत मांडलं आहे.
“निवडणुकीच्या आधीचं बजेट चांगलं असतं”
1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प पार पडला. या अर्थसंकल्पाची सर्वत्र चर्चा आहे. यावर आता शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, निवडणुकीच्या आधीचं बजेट चांगलं असतं, मात्र निवडणुकीनंतर बजेट हे खरं बजेट असतं, अशी प्रतिक्रियी दिली आहे.
यावेळी बोलत असताना त्यांनी माझ्या लोकांना गरज लागल्यावर मी हजर राहणार असल्याचं त्या अनेकदा म्हणाल्या आहेत. जो उमेदवार चांगला आहे तो उमेदवार त्या त्या भागामध्ये द्यावा, असं देखील त्या आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बोलल्या आहेत.
“महिला-पुरूष भेद करू नका”
राजकारणामध्ये अनेकदा महिलांना डावललं गेलं आहे, यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रकाश टाकला आहे. महिला-पुरुष असा भेद करू नका. महिला उभी राहिली आणि ती काम करणारी नसेल तर त्याला अर्थ नाही. सरकारचं काम करायला पाच वर्षे लागतात एक ते दीड वर्षामध्ये काम होत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
News Title – Sharad Pawar on Sharmila Thackeray Statement
महत्त्वाच्या बातम्या
IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद
बिल्डरांच्या मनमानीला चाप लागणार, सर्वसामान्यांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय!
“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औकात नाही”
Maratha Reservation: मराठा समाजाविरोधात कोर्टात धाव घेतलेल्या ओबीसी संघटनांना मोठा झटका
‘तू आमदार तुझ्या घरी, पाय उखडून टाकायला कार्यकर्ते….’; रूपाली पाटील भडकल्या