‘मनोज जरांगे पाटील फसवले गेले’; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | मराठा समाज गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दोन कोटी मराठा बांधव सोबत घेत अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला वाशी येथे आध्यादेश देखील दिला. यामध्ये मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण केल्याचं आध्यादेशामध्ये नमूद केलं, मात्र पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे 10 फेब्रुवारीला उपोषण करणार आहेत. यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलत असताना राज ठाकरे यांना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत विजयोत्सव साजरा केला. मात्र पुन्हा ते 10 फेब्रुवारीला आरक्षणासाठी उपोषण करत आहेत, याबाबत विचारलं असता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मराठा आरक्षणाबाबत मी सांगितलं होतं की हे होऊ शकणार नाही. या कायदेशीरबाबी आहेत. तो टेक्निकल विषय आहे. असा निर्णय सरकार घेऊ शकत नाही, हे मी याआधी देखील लोकांसमोर सांगतिलं आहे. यासाठी मराठा बांधवांना सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल. अनेक प्रोसेस असून मला वाटतं की त्यानंतर याचा विचार करणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Raj Thackeray | पुन्हा उपोषण का?

मराठा समाजाला सरकारने आध्यादेश दिला त्यामध्ये सर्व मागण्या मान्य केल्या. मात्र हे केवळ गाजर दाखवण्याचं काम असल्याचं बोललं गेलं आहे. मराठा बांधवांनी विजयोत्सव केला. मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे-पाटील उपोषण करणार आहेत यावर राज ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्री त्या दिवशी तिथं गेले, त्यावेळी विजयोत्सव साजरा करण्यात आला. कोणता विजय मिळाला? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मराठा बांधव मोर्चाला गेलेले त्यांना कळालं का काय झालं? विजय झाला मग उपोषणाला कशाला बसता?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच त्यांनी 1995 आणि 2014 च्या राजकारणावर आपलं मत मांडलं आहे.

“1995आणि 2014साली लोकांनी रागातून मतदान केलं.”

“1995 आणि 2014 साली लोकांनी रागानं मतदान केलं. 1995 साली बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून लोकांनी रागानं मतदान केलं, यावेळी काँग्रेसची मत भाजप आणि शिवसेनेला मिळाली”. त्यानंतर त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर देखील प्रकाश टाकला. अशा प्रकारचं राजकारण भाजपला परवडणारं नाही. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलं नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

News Title – raj thackeray on manoj jarange patil about maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या

‘…त्या दोघांपासून जीवाला धोका’; स्वाती मोहोळचा खळबळजनक दावा

पूनम पांडेचा झाला मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

IPL की PSL जगातील सर्वात बेस्ट ट्वेंटी-20 लीग कोणती? Babar Azam चा चाहत्यांसोबत संवाद

बिल्डरांच्या मनमानीला चाप लागणार, सर्वसामान्यांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय!

“आरक्षण घ्यायची मनोज जरांगे पाटील यांची औ