महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Prakash Ambedkar | राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मोदी सरकारला मात देण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र येऊन मोदी सरकारविरोधात लढताना दिसत आहेत. अनेक महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची महाविकास आघाडीसोबत युतीबाबत तळ्यातमळ्यात परिस्थिती पाहायला मिळत होती. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये आपल्या पक्षाला घेत युती केली आहे. महाविकास आघाडीमधील त्यांची ही पहिली सभा आहे.

महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकरांची पहिलीच सभा झाली असून यावेळी त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासमोर इंडिया आघाडी संपली असल्याचं वक्तव्य केलं आहे. कारण सध्या इंडिया आघाडीतून एक-एक नेते बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. मात्र आम्ही महाविकास आघाडीचं असं होऊ देणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

मुंबई येथे ट्रायडेंट या हॉटेलमध्ये सभा पार पडली. यासभेमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात येईल याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सध्या इंडिया आघाडीचं झालं तसं महाविकास आघाडीचं होऊ देणार नसल्याचं सांगितलं आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सभा ठेवण्यात आली होती. यावेळी त्यांनी थेट इंडिया आघाडीवर भाष्य केलं. सध्या इंडिया आघाडीसोबत जोडलेल्या नेत्यांनी वेगळी चूल मांडल्यानं महाविकास आघाडीचं असं होऊ देणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. “इंडिया आघाडी आता शिल्लक राहिली नाही. इंडिया आघाडीचं जे झालं ते आमच्या आघाडीचं होऊ देणार नाही. अखिलेश आणि कॉंग्रेसचे जे कोणी शेवटचे पार्टनर होते ते देखील वेगळे झाले आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडी घट्ट पाय रोवून आहे. राज्याबाहेर तसं दिसत नसलं तरीही महाविकास आघाडीची सध्या चांगली परिस्थिती आहे. महाविकास आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये युती तुटू देणार नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

चर्चांना पूर्णविराम

अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार असल्याच्या केवळ चर्चा होत्या. काही दिवसांआधी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना आपल्यासोबत युतीसाठी हिरवा कंदील दाखवला होता. मात्र काँग्रेस पक्ष तयार नव्हता, दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहित युतीबाबत निवेदन केलं, आता प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये आले असून सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

News Title – prakash ambedkar statement About india aghadi

महत्त्वाच्या बातम्या

गुडन्यूज! आरोग्य विमा खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

‘शरद पवारांना जाणता राजा म्हणतो पण…’; ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं वक्तव्य चर्चेत

‘मनोज जरांगे पाटील फसवले गेले’; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

गोव्यातील व्हिडीओ शेअर करत पुनम पांडे म्हणाली “माझं जीवन…”

मोठी बातमी! एकनाथ शिंदे रूग्णालयात दाखल